माळेगाव एमआयडीसीतील कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:51 AM2018-03-19T00:51:30+5:302018-03-19T00:51:30+5:30
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला शनिवारी (दि.१७) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनी रात्री बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला शनिवारी (दि.१७) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनी रात्री बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. हरिप्रीतसिंग गोव्हर यांच्या अंगद इंड्रस्टिज कंपनीत कोळशापासून कार्बन पावडर तयार केली जाते. शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. त्यानंतर माळेगाव एमआयडीसीतील अग्निशमन दलाला पहाटे पाचारण करण्यात आले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन बंबालादेखील बोलविण्यात आले. जवानांना आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी येत होत्या. सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांन यश आले. तोपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. अग्निशमन अधिकारी पी. आर. घोलप, बी. के. चौधरी, पी.पी. पाटील, ए. जे. खरात, एस. डी सोनवणे, डी. के. मलगुंडे, डी. आय. पाटील, टी. एस. वखरे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविले.