विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर काढताना ‘अग्निशामक’चा जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:38 PM2018-08-04T12:38:42+5:302018-08-04T12:44:42+5:30

विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले.

Fire Brigade personnel injured when carrying out the dead turtle in the well | विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर काढताना ‘अग्निशामक’चा जवान जखमी

विहिरीत मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर काढताना ‘अग्निशामक’चा जवान जखमी

Next
ठळक मुद्दे कासवाचा मृत्यू सुमारे पाच ते सहा दिवसांपुर्वी झाला कासवाचे वय अधिक होते व सुमारे तीन ते चार किलो वजन

नाशिक : पंचवटी परिसरातील श्रीकृष्णनगरमध्ये शैनेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका जुन्या पडीक विहिरीत अधिवास असलेल्या वयस्कर कासवाचा अक स्मात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत कासवाला विहिरीतून बाहेर काढताना अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमन देविदास चंद्रमोरे कठडा कोसळल्याने जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, विहिरीतून दुर्गंधी परिसरात पसरत असल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ रहिवाशांनी सदर बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधितांनी अग्निशामक दलाला घटना कळविली असता अग्निशामक दलाचे कोणार्कनगर येथील विभागीय केंद्रावरू न बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. विहिरीमध्ये काही प्रमाणात पाणी होते व काही भागात मलबा पडलेला होता. अग्निशामक दलाचे जवान सुनील पाटील हे दोरखंड लावून विहिरीत उतरले. यावेळी विहिरीच्या कठड्याला लागून असलेल्या एका जुन्या स्लॅबवर संरक्षक कठडा ओलांडून चंद्रमोरे हे शिडीसोडण्यासाठी उतरले; मात्र स्लॅब पावसाने कमकुवत झाला असल्याने अचानकपणे कोसळला व चंद्रमोरे विहिरीत कोसळले. त्यांच्या हातापायांना किरकोळ दुखापत झाली असून विहिरीत उतरलेले पाटील यांनी तत्काळ मोरे यांनी उचलून शिडीवरुन बाहेर नेले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पाटील यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कासवाला बाहेर आणत वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी रविंद्र सोनार यांच्या ताब्यात दिले. कासवाचा मृत्यू सुमारे पाच ते सहा दिवसांपुर्वी झाला असावा, असे पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी व शवविच्छेदनानंतर स्पष्ट केले. कासवाचे वय अधिक होते व सुमारे तीन ते चार किलो वजन असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

गोड्या पाण्यातील कासव

उभयचर प्राण्यांपैकी एक म्हणजे कासव. कासवाचे विविध प्रकार आहेत. समुद्री कासव गोड्या पाण्यातील कासव असे. नैसर्गिक जैवसाखळीतील कासव हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्या शरीराचे डोके, मान, धड व शेपूट असे प्रमुख अंग असतात. गोड्या पाण्यातील कासवे विहिर, तलाव, नदी, नाले, ओहोळात अधिवासासाठी असतात. ही कासवे जमिनीवरही सहज राहू शकतात.
 

Web Title: Fire Brigade personnel injured when carrying out the dead turtle in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.