नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 08:54 PM2018-01-06T20:54:12+5:302018-01-06T21:49:51+5:30

संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.

Fire brigade slums in Nashik; The world of seven poor families burnt down! | नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !

googlenewsNext
ठळक मुद्दे अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.घरातील सर्व संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी युवकांनी जळत्या झोपड्यांमध्ये जाऊन सर्वप्रथम सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

नाशिक : येथील गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सुमारे पंधरा ते वीस झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या कारण आगीने भीषण रुप धारण केले होते.


जुने नाशिक भागातील भद्रकाली पोलीस ठाण्याला लागून असलेल्या गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी आहे. या भागात गवतासह भंगार मालाच्या विक्रीची दुकाने आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.

झोपड्यांवरील प्लॅस्टिक लाकूड मोठ्या प्रमाणात पेटल्याने घरातील सर्व संसारपयोगी वस्तूंची राखरांगोळी झाली. घरातील रोख रक्कम, दागिणे, भांडी सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भागात मोठ्या संख्येने युवक गॅस सिलिंडर पोहचविण्याचे काम विविध वितरकांकडे करत असल्यामुळे धाडसाने युवकांनी जळत्या झोपड्यांमध्ये जाऊन सर्वप्रथम सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली व अग्निशामक दलाला आगीवर त्वरित नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

घटनास्थळांपासून जवळच असलेल्या अग्निशामक दलाच्या शिंगाडा तलाव येथील वीर बापू गायधनी मुख्यालयाचे दोन बंब त्वरित दाखल झाले. दहा ते बारा जवानांनी त्वरित आग विझविण्यास सुरूवात केली. तोपर्यंत सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या भागातील उपकेंद्रावरुनही बंब घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी अरुं द गल्ली बोळ असल्यामुळे बंबांना पोहचण्यास अडथळा आला. त्यामुळे जवानांनी मोकळ्या जागेत मुख्य रस्त्यावर बंब उभे करुन तेथून पाण्याचे होज आणत मारा सुरू केला. सुमारे तीस जवानांनी शर्थीची प्रयत्न करुन अवघ्या अर्ध्या तासात आग संपूर्णपणे विझविली. त्यामुळे अनर्थ टळला. मुख्यालयाकडून त्वरित अग्निशामक दलाच्या उपकेंद्रांची मदत घेण्यात आल्यामुळे भीमवाडी भागात आगीचा होणारा तांडव शमला.

Web Title: Fire brigade slums in Nashik; The world of seven poor families burnt down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.