घरात उडाला आगीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:26 PM2021-05-30T22:26:54+5:302021-05-31T00:52:56+5:30

नाशिक : कॉलेज रोड परिसरातील पाटील लेन क्रमांक ३ मधील गंगालीला अपार्टमेंट तिसऱ्या मजल्यावरील सातव्या सदनिकेत शॉर्टसर्किट झाल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. हे अग्नितांडव अर्धा तास सुरू असताना अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा मारा करत जवानांनी आग विझविली.

A fire broke out in the house | घरात उडाला आगीचा भडका

घरात उडाला आगीचा भडका

Next
ठळक मुद्देवडनेरकर हे मानसिक रोगी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नाशिक : कॉलेज रोड परिसरातील पाटील लेन क्रमांक ३ मधील गंगालीला अपार्टमेंट तिसऱ्या मजल्यावरील सातव्या सदनिकेत शॉर्टसर्किट झाल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. हे अग्नितांडव अर्धा तास सुरू असताना अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा मारा करत जवानांनी आग विझविली.

गंगालीला अपार्टमेंटमध्ये एस. पी. वडनेरकर हे एका सदनिकेत वास्तव्यास आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी केलेल्या एका गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर वडनेरकर येथील घरात एकटेच राहत होते. रविवारी त्यांच्या घरात अचानकपणे आगीचा भडका उडाला आणि त्यांनी इमारतीची गच्ची गाठली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयातून दोन बंबांसह जवानांनी घटनास्थळ गाठले. यावेळी सदनिकेतून धूर येत असल्याचे दिसत होते. जवानांनी पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. मात्र, घराच्या खिडक्या दारे बंद असल्याने पाणी आतमध्ये पोहोचत नव्हते. सदनिकेचा दरवाजा आतील बाजूने बंद असल्याने दरवाजाही कोणी उघडत नव्हते. अखेर जवानांनी दुसऱ्या बाजूने बाल्कनीपर्यंत जाऊन खिडक्यांच्या काचा फोडत त्याद्वारे पाण्याचा मारा करत आग विझविली. दरम्यान, जवानांनी पोलिसांची मदत मागितली. काही वेळेतच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांच्या मदतीने वडनेरकर यांना गच्चीवरून खाली आणत सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. वडनेरकर हे मानसिक रोगी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

फोटो आर वर ३०कॉलेज रोड नावाने सेव्ह.

Web Title: A fire broke out in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.