फायर सिलिंडर आऊटडेटेड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:14 AM2021-01-23T04:14:49+5:302021-01-23T04:14:49+5:30
इन्फेा.. स्टोअर रूममधील रद्दी भस्मसात शिवसेना गटनेता कार्यालयाला आग लागल्याची चर्चा पसरली असली तरी ही आग प्रत्यक्षात गटनेता कार्यालयासमोरील ...
इन्फेा..
स्टोअर रूममधील रद्दी भस्मसात
शिवसेना गटनेता कार्यालयाला आग लागल्याची चर्चा पसरली असली तरी ही आग प्रत्यक्षात गटनेता कार्यालयासमोरील दोन कक्षांमध्ये होती. त्यातील स्टोअर रूम म्हणून एक कक्ष वापरला जात होता. त्यात वृत्तपत्रांची रद्दी आणि काही फाईली होत्या. दुसऱ्या कक्षात चहापान आणि विश्रांती कक्ष म्हणून वापरला जात असे. आगीत पंखा आणि एसीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आगीच्या ज्वाळा शरणपूर रोडवरून जाणाऱ्या-येणाऱ्यांना दिसत होत्या. इतक्या मोठ्य प्रमाणात आग भडकली होती; परंतु नंतर ती आटोक्यात आली.
इन्फो...
चौकशी समिती नियुक्त
महापालिकेतील आगीचा धूर कमी होत नाही तोच सुरू झालेल्या चर्चांमुळे आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने चाैकशी समिती गठित केली आहे. शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) शिवाजी चव्हाणके आणि मुख्य अग्निशमन दलप्रमुख संजय बैरागी यांचा चौकशी समितीत समावेश आहे. त्यांना तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.