दापूरे येथे आगीत लाखोचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:09 PM2020-06-19T16:09:25+5:302020-06-19T16:09:58+5:30
मालेगाव : तालुक्यातील दापूरे येथील शेतकरी भगवान रतन चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे.
मालेगाव : तालुक्यातील दापूरे येथील शेतकरी भगवान रतन चव्हाण यांच्या घराला लागलेल्या आगीत जवळपास पाच लाखांचे नुकसान होऊन संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चव्हाण कुटूंबीय आपल्या मळ्यातील घर असलेल्या शेतात काम करत असतांना घरातील गँस सिलेंडरचा स्फोट झाला. गावातील लोकांनी शेताकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला.परंतू तोपर्यंत संसारोपयोगी वस्तूंसह संसाराची राखरांगोळी झाली होती. आगीमुळे घरातील चाळीस क्विंटल बाजरी,वीस क्विंटल मका यासह रोख रक्कम साठ हजार,अठरा ग्रँम सोने,चांदी तसेच टी.व्ही.,मोबाईल, पंखे,गँस,भांडी,कपाट,कपडे,कडधान्ये इत्यादी अंदाजे चार लाख नव्वद हजार सहाशे रु पयांचे नुकसान झाले.सुदैवाने जीवित हानी टळली. पंचकमिटीने या घटनेचा पंचनामा केला. संपूर्ण चव्हाण कुटुंबीय भर पावसाळ्यात उघड्यावर पडले असल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने सोळा हजार रु पयांची वर्गणी जमा करु न दिली. उघड्यावर पडलेल्या या कुटूंबाच्या मदतीसाठी मालेगावचे नगरसेवक मदन गायकवाड व सुनिल गायकवाड यांनी चव्हाण कुटूंबाची भेट घेऊन त्या व्यक्तीना कपडे, किराणा माल, संसार उपयोगी साहित्य दिले. दापूरे सरपंच वाल्मिक सुर्यवंशी, उपसरपंच प्रदीप पवार व अभिमन डामरे, मधुकर शिंदे, संभाजी भदाणे, शशिकांत भदाणे, भगवानं खंगरे, भीमराव जाधव उपस्थित होते.