अग्नीशमन बंबाचा वापर शौचालयाच्या स्वच्छतेसाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:52 PM2018-07-04T14:52:23+5:302018-07-04T14:54:12+5:30

Fire extinguish bombs used to clean the toilets! | अग्नीशमन बंबाचा वापर शौचालयाच्या स्वच्छतेसाठी !

अग्नीशमन बंबाचा वापर शौचालयाच्या स्वच्छतेसाठी !

Next
ठळक मुद्देभगूर नगरपालिकेचा प्रकार : प्रशिक्षीत कर्मचा-यांचा अभाव  बंबाचा उपयोग गेल्या तीन वर्षापासून उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यासाठी

भगूर : भगुर नगरपालिकेने अग्निसुरक्षेसाठी खरेदी केलेली अग्निशमन गाडी प्रशिक्षित कामगारांअभावी शौचालय साफसफाई करीता वापरली जात असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. 
भगूर नगरपालिका हद्दीत कुठेही आग लागल्यास आग विझविण्यासाठी स्वत:ची यंत्रणा असावी यासाठी भगूर नगर परिषदेने मराठी शाळेजवळ सन २०१५ साली फायर स्टेशन इमारत व अग्निशमन कामगारांना घरे तयार करून लाखो रुपयांचर बंब खरेदी केला व जनतेच्या घरपट्टीत अग्निशमन कर वसूल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या अग्निशमन दलात काम करण्यासाठी प्रशिक्षित फायरमन कामगार आजपर्यंत भरले नाहीत. परिणामी भगुर गावात अनेक वेळा आग लागुनही ती विझविण्यासाठी देवळाली छावणी परीषद किंवा नाशिक महापालिकेचे बंबांची मदत घ्यावी लागली आहे. भगूर पालिकेची अग्निशमन केंद्र इमारत रिकामी असुन बंब समतावाडीतील पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्रावर उभी करून ठेवलेली असते. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांसाठी बांधण्यात आलेल्या घरामध्ये पालिकेचे कामगार, शिपायांचे वास्तव्य आहे.
अग्नीशमनासाठी खरेदी केलेल्या बंबाचा उपयोग गेल्या तीन वर्षापासून उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करण्यासाठी केला जातो आणि पावसाळ्यात सार्वजनिक शौचालय साफसफाई करण्यास अग्निशमन गाडी वापरली जात असून, यासंदर्भात भगूर पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, नाव न सांगण्याच्या अटीवर सुत्राने सांगितले की, शहराच्या अग्नीसुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे यंत्रणा उभारली असली तरी, त्यासाठी प्रशिक्षित कामगार भरती करण्याचा अधिकार जिल्हाधिका-यांना आहे. या बाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येवूनही कर्मचारी भरतीसाठी अनुमती मिळत नाही त्यामुळे अग्निशमन गाडीचा वापर इतरस्त करावा लागतो नाहीतर गाडी खराब होण्याची शक्यता आहे.
    

Web Title: Fire extinguish bombs used to clean the toilets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.