फायर एक्स्टिंग्विशर हाताळण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:03 AM2021-01-13T01:03:31+5:302021-01-13T01:03:54+5:30
आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही फायर एक्स्टिंग्विशर हाताळले.
नाशिक : आग लागल्यानंतर फायर एक्स्टिंग्विशरच्या साह्याने विझविण्यासाठीची तातडीची व्यवस्था असते. मात्र हे यंत्र चालविण्याची माहिती असणे अपेक्षित आहे. या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही फायर एक्स्टिंग्विशर हाताळले.
जिल्हाधिकारी कार्यालयात फायर एक्स्टिंग्विशर बसविण्यात आले आहे. या आवारात जवळपास ५३ विभाग असून, असंख्य कर्मचारी येथे काम करतात. या कार्यालयांमध्ये एक्स्टिंग्विशर बसविण्यात आलेल आहे. आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून फायर एक्स्टिंग्विशर यंत्रणा महत्त्वाची ठरते. अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित असणे अपेक्षित असल्याने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कर्मचाऱ्यांसाठी आग विझविण्याचे प्रशिक्षण आयेाजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्यासारखी परिस्थिती निर्माण करून आपत्ती व्यवस्थापन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने आग तत्काळ विझविण्यात आली. याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची माहिती देण्यात आली. जॉन भालेकर, मनोज मुनिंद्र कनोजिया भगवान सुकेश्वर पंडित, पराग विकास कुलकर्णी यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना यंत्रणा चालविण्याबाबत सजग करण्यावर भर देण्यात आला. त्यानुसार उपस्थित जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष यंत्रणा चालविण्यासाठी दहा फायर एक्स्टिंग्विशरचा वापर करण्यात आला. महिला कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी दाखविलेल्या धाडसाबद्दल कौतुक करण्यात आले. आग लागण्याच्या परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली तर महिलाही यंत्रणा सहज हाताळू शकतात, याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात आले.