वनविभागाच्या क्षेत्रात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:48 PM2020-12-24T20:48:01+5:302020-12-25T00:55:30+5:30
वणी : फोपशी रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वनविभागाच्या जंगलात आग लागुन मोठ्या प्रमाणावर हाणी झाली असुन गवत ,जंगली वनस्पती ...
वणी : फोपशी रस्त्यावरील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वनविभागाच्या जंगलात आग लागुन मोठ्या प्रमाणावर हाणी झाली असुन गवत ,जंगली वनस्पती यांना क्षती पोहचली असुन वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविली असुन अज्ञाताने आग लावण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फोपशी परिसरात वनवीभागाच्या कार्यक्षेत्रात मोठी वनजमिन आहे या जमिनीत अनेक वृक्ष,वनस्पती, गवत जंगली औषधउपयोगी झाडे असुन याच्या संरक्षणासाठी अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे त्यातच सुमारे एक ते दिड हेक्टरपेक्षा जास्त वनजमिनीत ही आग लागुन वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे.
वणी फोपशी रस्ता हा असमाजीक घटकांचा अड्डा झाला असुन त्यापैकी काहीनी ही आग लावलीअसावी वाळलेले गवत पेटविल्याने आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. दरम्यान या आगीमुळे पशु पक्षी व वन्यजीव यांच्या हक्काचे वास्तव्यावर परिणाम झाला असल्याची भावना वन्यप्रेमीची झाली आहे दरम्यान वनवीभागाच्या या संपत्तीच्या संरक्षणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी करण्यात येत आहे.