खंबाळेत वनविभागाच्या क्षेत्रात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 09:54 PM2020-05-06T21:54:45+5:302020-05-06T23:56:47+5:30

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली.

Fire in the forest area in Khambal | खंबाळेत वनविभागाच्या क्षेत्रात आग

खंबाळेत वनविभागाच्या क्षेत्रात आग

googlenewsNext

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाच्या लागवड केलेल्या क्षेत्रात मंगळवारी (दि. ५) रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून ८ ते १० हेक्टरवर लागवड केलेली झाडे नष्ट झाली.
दातली - खंबाळेदरम्यान वनविभागाचे सुमारे १०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या पावसाळ्यात यापैकी २५ हेक्टर जागेत वृक्षारोपण करण्यात आले आहे. या झाडांची वाढदेखील चांगली झाली आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत लागवड केलेली सुमारे २० हजार झाडे जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबद्दल वनविभागाकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सिन्नर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र खंबाळेत आहे. या क्षेत्रात चराई बंद असल्यामुळे गवत जास्त आहे.
आग लागल्याचा प्रकार बघितल्यावर शेतकरी चिंतामण आंधळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. तोपर्यंत त्यांच्याकडे कामाला असणाºया मजुरांना घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. निरोप मिळाल्यावर वनविभागाचे कर्मचारी, गावातील युवक मदतीला धावले. मात्र, पण आगीची भीषणता मोठी होती. अचानक लागलेली आग आटोक्यात आणताना सर्वांच्या नाकीनऊ आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली; मात्र १० हेक्टर क्षेत्रातील हजारो झाडे जळून गेली होती.
बुधवारी (दि. ६)दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनपाल अनिल साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Web Title: Fire in the forest area in Khambal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक