खेरवाडीला इलेक्ट्रिकल दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:21 PM2018-11-10T17:21:16+5:302018-11-10T17:21:39+5:30
दुकान खाक : दीड ते दोन लाखांचे नुकसान
चांदोरी : खेरवाडी येथील रेल्वेस्थानक जवळील प्रभाकर विश्वनाथ पठाडे यांच्या सायकल व इलेकिट्रकल दुकानाला आग लागून दुकान भस्मसात झाले. यात सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही, मात्र सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
चांदोरी येथील रहिवासी असलेले प्रभाकर विश्वनाथ पठारे यांचे खेरवाडी येथे सायकल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे दुकान असून दीपावली सणामुळे दोन दिवसांपासून दुकान बंदच होते. शनिवारी (दि.१०) दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागल्याचे बाजूला उभे असलेल्या काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखून सायखेडा पोलीस स्टेशन तसेच पिंपळगाव अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केले. घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे हे तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. आग इतकी तीव्र स्वरूपाची होती ती पिंपळगाव ग्रामपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत दुकान हे सागाच्या लाकडापासून बनलेले असल्याने पूर्ण बेचिराख झाले होते. त्यानंतर दहा मिनिटांनी ओझर एअर फोर्स व नाशिक महानगरपालिकेच्याही दोन गाड्या आल्याने आजूबाजूच्या घरांना आग लागण्याचा धोका टळला . आग विझवण्यासाठी दुकानाचे शटर तोडून तसेच मागची भिंत फोडून दोन गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी सिलिंडर काढणारे तरु ण संदीप आवारे, गणेश आवारे ,धनंजय आवारे ,मंगेश आहेर, राकेश आवारे, जयेश शिंदे, गणेश मोते आदींचे ग्रामस्थांनी आभार मानले .