मालेगावी कापड दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:39 PM2019-04-02T23:39:46+5:302019-04-02T23:42:37+5:30
मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मालेगाव : शहरातील सटाणा रोडवरील सेजल जयेश शहा यांच्या सार्थ बुटिक या कापड दुकानाला मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहा बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यात लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी गर्दी केल्यामुळे अग्निशामक दलास आग विझविण्यास मोठा व्यत्यय आला, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केल्याने कापड दुकानाच्या वर असलेल्या रुग्णालयातील खबरदारी म्हणून रुग्णांना तातडीने इतरत्र हलविण्यात आले. सेजल जयेश शहा यांच्या मालकीचे सार्थ बुटिक हे कापड दुकान आहे. यशश्री कंपाउण्डमध्ये सकाळी योगसाधना करीत असलेल्या साधकांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले.
सध्या शहर परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, ४२ अंशांवर तापमान पोहोचल्याने जीव लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम म्हणूनच परिसरात आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. आगीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढगेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहर व परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात चंदनपुरी गेट परिसरात सुमारे तीन ते चार घरांना आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. संगमेश्वरातील सावतानगर भागात मोकळ्या जागेवरील गवताला आग लागली होती. उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार घडत असतात. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आपल्या आस्थापनांचे फायर आॅडिट करणे गरजेचे आहे. बहुतांशी आस्थापनांमध्ये फायर मशीन बसविण्यात आलेले नाही. मनपा नोटिसा बजावून कायदेशीर पूर्तता करून घेत आहे.