गादी कारखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:37 PM2020-01-22T23:37:21+5:302020-01-23T00:25:38+5:30
गादीच्या कारखान्यास बुधवारी (दि. २२) भीषण आग लागली. त्यात लाखोंचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती कारखान्याचे मालक शमीन पिंजारी यांनी दिली.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील गादीच्या कारखान्यास बुधवारी (दि. २२) भीषण आग लागली. त्यात लाखोंचे नुकसान झाले असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती कारखान्याचे मालक शमीन पिंजारी यांनी दिली.
येथील मुंबई महामार्गालगत शमीन हाजी अहमद पिंजारी यांचा गाद्यांचा छोटा कारखाना आहे. बुधवारी सायंकाळी शॉर्टसर्किट झाल्याने कारखान्याने अचानक पेट घेतला. कारखान्यात कापूस मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. माहिती मिळताच पिंपळगाव अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात येत नसल्याने एचएएलचे बंबही बोलविण्यात आले. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनीही पथकासह घटनास्थळ गाठले. बघे आणि वाहनाच्या गर्दीमुळे महामार्गावर सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे नुकसान झाल्याचे पिंजारी यांनी सांगितले.
(फोटो : 22पिंपळगाव3)