आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

By admin | Published: March 24, 2017 11:54 PM2017-03-24T23:54:05+5:302017-03-24T23:54:25+5:30

मनमाड : वेळ सकाळी १० वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजू लागला. सर्वत्र एकच धावपळ उडाली.

Fire prevention demonstrations | आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

आग प्रतिबंधक प्रात्यक्षिके

Next

मनमाड : वेळ सकाळी १० वाजेची. पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीत धोक्याचा सायरन वाजू लागला. सर्वत्र एकच धावपळ उडाली. प्रकल्पातील इंधन टाकीच्या व्हॉल्व्हजवळ लिकेज होऊन आग लागल्याची सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात येते. अग्निशमन दल, सहायक दल व बचाव दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचतात. जिवाची पर्वा न करता फोम व पाण्याच्या फवाऱ्यांनी अवघ्या काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश मिळते व हिरवा झेंडा फडकवून धोका टळल्याचा संदेश देण्यात आला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु याचे निमित्त होत अचानक अशी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची चाचणी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले प्रात्यक्षिक. मनमाडजवळील पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पात चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणा तसेच आग विझवणारी उपकरणे व यंत्रसामग्री याची गुणवत्ता व परिस्थिती तपासण्यासाठी वर्षातून दोन वेळा आपत्कालीन आग प्रतिबंधक प्रात्यक्षिकांचे आयोजन इंधन कंपन्यांमध्ये करण्यात आले होते. प्रकल्प प्रबंधक देवीदास पानझाडे यांनी उपस्थित परिक्षकांचे स्वागत करून प्रकल्पाची व्याप्ती तसेच सुरक्षा साधने व उपाययोजनांची माहिती दिली. इंधन टाकी क्रमांक २ सी जवळ गळती होऊ लागल्याने आग लागते. धोक्याचा सायरन वाजल्यानंतर तीनही दलाचे जवान घटनास्थळी दाखल होतात. पंपाद्वारे फोमचा मारा करून आगीवर नियंत्रण आणण्यात येते. बाजूलाच असलेल्या इंधनाच्या टॅँकरला उष्णतेची झळ पोहोचू नये यासाठी पाण्याचा फवारा मारण्यात येतो. अवघ्या १५ मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळते व धोका टळल्याचा संदेश देण्यात येतो. प्रात्यक्षिकानंतर आयोजित चर्चासत्रात प्रात्यक्षिकादरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व उणिवा तसेच अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. मनोज नलावडे व जयश्री चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.
(वार्ताहर)


 

Web Title: Fire prevention demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.