सातपूरच्या ग्राफाइट कंपनीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:17 PM2020-06-05T16:17:00+5:302020-06-05T16:21:00+5:30

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्राफइट इंडिया (कार्बन कॉर्पोरेशन) कंपनीच्या चिमणीला (बॉयलर) शुक्र वारी सकाळी पावणेअकरा वाजता पेटल्याने आकाशात ...

Fire at Satpur Graphite Company | सातपूरच्या ग्राफाइट कंपनीला आग

सातपूरच्या ग्राफाइट कंपनीला आग

Next
ठळक मुद्देआकाशात सर्वत्र धुराचे लोळदोन बंब घटनास्थळी

सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्राफइट इंडिया (कार्बन कॉर्पोरेशन) कंपनीच्या चिमणीला (बॉयलर) शुक्र वारी सकाळी पावणेअकरा वाजता पेटल्याने आकाशात सर्वत्र धुराचे लोळ पसरले होते. या आगीची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
अग्निशमन दलाचे जी. एम. औसरकर, व्ही. जे. नागपुरे, व्ही. के. मुसळे, पी. सूर्यवंशी, ए. पी. मोरे, एम. एस. बागुल, एम. ए. शिंदे, जी. एम. दोबाडे आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन दोन तासात आग विझविली. तसेच एमआयडीसीचा एक बंब आणि महिंद्र अँड महिंद्र कंपनीचा बंबदेखील दाखल होऊन आग विझविण्यास मदत केली. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरीही आग खूपच भयावह होती. आकाशात सर्वत्र धुळीचे लोट दिसत होते.

Web Title: Fire at Satpur Graphite Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.