आगीचे लोळ अन् अवकाशात लख्ख प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:18 AM2021-09-07T04:18:44+5:302021-09-07T04:18:44+5:30
नागरिक झाले भयभीत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे बंधू काशिनाथ चव्हाण यांच्या घराजवळ अवघ्या तीस-चाळीस फुटांवर एक टॉवर असून ...
नागरिक झाले भयभीत
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे बंधू काशिनाथ चव्हाण यांच्या घराजवळ अवघ्या तीस-चाळीस फुटांवर एक टॉवर असून याच टॉवरच्या पुढच्या टॉवरवर हे भयानक शॉर्टसर्किट झाले. यावेळी आगीचा लोळ उंच उठून सर्वत्र दिवसासारखा लख्ख प्रकाश पडला होता. हा प्रकार जवळपास पंधरा मिनिटे सुरू होता. यावेळी आम्ही सर्व जण घाबरलो होतो, अशी माहिती काशिनाथ चव्हाण यांनी दिली. विशेष म्हणजे हा प्रकाश काही किलोमीटरच्या परिसरातील असंख्य नागरिकांनी पाहिला. अतिउच्च दाबाच्या या वीजवाहिनीची पायी चालत जाऊन वर्षातून दोन वेळा तपासणी केली जात असल्याचे समजते.
फोटो- ०६ सुरगाणा एनर्जी-१
प्रतापगड गावाजवळील याच टॉवरवर उच्च दाब असलेल्या वाहिनीवर शॉर्टसर्किट झाले होते. सोमवारी दुरुस्तीचे काम करताना कर्मचारी.
०६ सुरगाणा एनर्जी-२
टॉवरवरील शॉर्टसर्किटमुळे असा लख्ख प्रकाश पडला होता.
060921\06nsk_28_06092021_13.jpg~060921\06nsk_30_06092021_13.jpg
फोटो- ०६ सुरगाणा एनर्जी-१~०६ सुरगाणा एनर्जी-२