त्र्यंबकेश्वरला फटाका स्टॉल गावाबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 07:00 PM2021-11-03T19:00:30+5:302021-11-03T19:01:03+5:30

त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय ...

Firecracker stalls outside Trimbakeshwar! | त्र्यंबकेश्वरला फटाका स्टॉल गावाबाहेर !

त्र्यंबकेश्वरला फटाका स्टॉल गावाबाहेर !

googlenewsNext
ठळक मुद्देसंमती नसल्याने मात्र नगर परिषदेचा बुडाला महसूल

त्र्यंबकेश्वर : दिवाळीनिमित्त फटाके विक्रेत्यांना स्टॉल उभारणीचा विषय त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कार्यकक्षेत येत असल्याने आपली जबाबदारी झटकून तहसीलदार कार्यालय व पोलीस स्टेशन यांनी फटाके विक्रीचा चेंडू पालिकेच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे तुमच्या जबाबदारीवर गावाबाहेरील नेहमीच्या जागेवर स्टॉल उभारा; पण आम्ही लेखी परवानगी देणार नसल्याचे नगर परिषदेने सांगितल्याने अखेर त्र्यंबकेश्वर येथील फटाके विक्रेत्यांनी गावाबाहेर आपले स्टॉल उभारले आहेत.

दिवाळीची बाल-गोपालांमध्ये खरी ओळख म्हणजे फटाके, दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतषबाजी!
दिवाळीत फटाके फोडल्याशिवाय दिवाळसण साजरा केल्यासारखे वाटत नाही. तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात असल्याने या सणाचा सर्वत्र उत्साह चांगलाच जाणवत आहे.
त्र्यंबकेश्वर नगर परिषद, तर गेल्या वर्षभरापासुन वसुंधरा अभियान राबवत आहे. त्यामुळे पर्यावरण राखा, प्रदूषण नको. एवढेच नव्हे तर यावर्षी फटाके विक्री बंदीबाबत शासनाचा आदेश असल्याने नगर परिषदांनी फटाके विक्रीस बंदी केली आहे. शहराबाहेर पोलीस स्टेशननजीक फटाके विक्रेत्यांनी स्वखर्चाने १२ गाळे उभारून दुकाने थाटली आहेत.

यासंदर्भात नगर परिषदेने आम्ही फटाके विक्रीस बंदी केली आहे. त्यामुळे फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आम्ही माझी वसुंधरा अभियान राबवत असून, पर्यावरणाचा समतोल बिघडविणाऱ्या आणि प्रदूषणाला निमंत्रण देणाऱ्या फटाक्यांना आम्ही परवानगी देऊच शकत नाही, असे कार्यालयीन अधीक्षकांनी सांगितले.
दुसरीकडे तहसीलदार दीपक गिरासे म्हणतात. ही बाब नगर परिषदेच्या कार्यकक्षेतील असून, त्यांनीच परवानगी द्यायची की नाही ते ठरवावे, तर पोलीस प्रशासनानेदेखील नगर परिषदेकडे अंगुली निर्देश करून आपले अंग झटकले आहे. या परिस्थितीमुळे फटाके विक्रेत्यांनी गाळेही उभारले,

महसूल बुडाला
पालिकेने परवानगीस नकार देऊन नाहक महसूल बुडवला. याउलट अटी, शर्ती घालून परवानगी देणे गरजेचे होते. महसूल विभाग, पोलीस प्रशासन यामध्ये पडण्यास तयार नाही आणि नगर परिषदेने तुमच्या जबाबदारीवर गाळे उभारा, अशी मूक संमतीच दिली आहे.

 

Web Title: Firecracker stalls outside Trimbakeshwar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.