सिन्नरच्या आरोग्य यंत्रणेने घेतले आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 08:42 PM2021-01-16T20:42:10+5:302021-01-17T00:48:48+5:30
सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले.
सिन्नर : भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात आग लागल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक बाबींचे प्रात्यक्षिक येथील शासकीय रुग्णालयात पार पडले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व डॉक्टर्स,परिचारिका, सफाई कर्मचारी, वॉर्डबॉय, नगरपालिका कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण घेतले. एमआयडीसी येथील अग्निशामक अधिकारी गोसावी यांनी मॉकड्रिल करून घन व द्रव आग आटोक्यात आणण्याचे धडे व प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वत: धडे गिरवले.
ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . निर्मला पवार, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनीही प्रशिक्षणास हजेरी लावली. विद्युत पॅनल बोर्डला आग लागली तर लाकूड वापरून विद्युत रोधन करावे, सिलेंडरला आग लागली असल्यास त्यावर ओले ब्लँकेट टाकावे व पावडर सिलेंडर आणि कार्बन डायआॅक्साईड सिलेंडरचा कुठे वापर करावा, आणि साध्या साध्या प्रसंगावधनाने व छोट्या छोट्या गोष्टींमुळे आग कशी आटोक्यात येईल अशा बहुमूल्य टिप्स सर्व कर्मचाऱ्यांनी जाणून घेतल्या . त्याचबरोबर सिन्नर ग्रामीण रु ग्णालयास फायर सेफ्टी आॅडिट फॉर्म बी प्रमाणपत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या प्रयत्नातून मिळाले.
सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात आग आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतले. (१६ सिन्नर ३)