जागोजागी पेटल्या शेकोट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:37 PM2020-11-09T21:37:47+5:302020-11-10T01:37:20+5:30
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने जागोजागी शेकोटी पेटताना दिसत आहे.
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने जागोजागी शेकोटी पेटताना दिसत आहे.
यंदा पावसाने चांगलेच थैमान घातले होते तसेच परतीच्या पावसाने तर कहरच केला होता. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे होणारे आगमन यावर्षी एक महिना उशिरा झाले आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला या परिसरात चांगल्याप्रकारे थंडीची चाहूल लागल्याने ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस शेकोटी पेटवताना दिसत आहेत.
थंडीची चाहूल लागल्याने शेतकरीवर्गही रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात करताना दिसत आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना थंडी चांगली असले. उत्पन्ननी चांगले होते. त्यामुळे शेतकरीवर्ग थंडी पडल्याशिवाय गहू किंवा हरभरा पिकाची पेरणी करत नाही. परंतु आता थंडीची चाहूल लागल्याने शेतकरीवर्गही हरभरा व गहू पेरणी करताना दिसत आहे.
तसेच अनेक ग्रामस्थ या गुलाबी थंडीची मजा पहाटे उठून फेरफटका मारून घेतात. तरीपण यावर्षी जेवढी थंडी उशिरा झाली आहे, तितकीच थंडी यावर्षी जास्त प्रमाणात पडेल, अशी जुने ग्रामस्थांचे म्हणणे आहे.