मालेगावी चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:20+5:302021-02-25T04:17:20+5:30

मालेगावात शाहरूख खान आणि सलमान खान यांचे समर्थक रसिक मोठ्या संख्येने आहेत. चित्रपटात या अभिनेत्यांची एण्ट्री झाली ...

Fireworks display at Malegaon cinema | मालेगावी चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी

मालेगावी चित्रपटगृहात फटाक्यांची आतषबाजी

Next

मालेगावात शाहरूख खान आणि सलमान खान यांचे समर्थक रसिक मोठ्या संख्येने आहेत. चित्रपटात या अभिनेत्यांची एण्ट्री झाली की फटाके फोडून जल्लोष केल्याच्या घटना नेहमी घडत असतात. तब्बल साडे तीन वर्षानंतर अशी घटना घडली आहे. कारोनामुळे गेल्या काही काळापासून नवीन चित्रपट मालेगावी रिलीज होत नसल्याने चित्रपटगृह मालक जुनेच चित्रपट पुन्हा पुन्हा प्रक्षेपित करीत आहेत. शहरात विविध अभिनेत्यांच्या टोळ्या असून त्या-त्या अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित झाला की त्या अभिनेत्यांच्या समर्थक टोळ्या शोला गर्दी करतात. शिवाय फटाके फोडून जल्लोष करीत असल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील चित्रपटगृह मालक आणि चालकांना याची सवय झाली आहे. चित्रपट लागल्याच्या पहिल्या आठवड्यात बुकिंगसाठी तोबा गर्दी होत असते: कोरोनाकाळामुळे सध्या नवीन चित्रपट प्रदर्शित होणेही बंद झाले असले तरी टोळ्या मात्र जुन्या चित्रपटांनाही गर्दी करीत आहेत. असाच प्रकार २६ जून २०१७ रोजी मोहन चित्रपट गृहात घडला होता. त्यावेळी फटाके फोडणाऱ्या नऊ संशयितांना तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी अटक करून त्यांचेविरोधात कारवाई केली होती,

इन्फो

खान यांच्या एण्ट्रीला गाेंधळ

गेल्या १२ फेब्रुवारी रोजी सेंट्रल चित्रपटगृहात करण अर्जुन चित्रपटाच्या वेळी अभिनेता शाहरूखखान आणि सलमान खान यांची एंट्री होताच चाहत्यांनी सुतळी बॉम्ब आणि फटाके फोडल्याने धावपळ झाली होती, त्यात काही जणांनी मोबाईलमधून शूटिंग करन तो व्हायरल केल्याने याची शहरात चर्चा झाली. चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मोहंमद अशपाक मोहंमद सुलेमान यांनी फिर्याद दिली असून पोलीस नाईक एस.बी.काळे अधिक तपास करीत आहेत.

फोटो- २४ मालेगाव सेंट्रल

===Photopath===

240221\24nsk_27_24022021_13.jpg

===Caption===

फोटो- २४ मालेगाव सेंट्रल 

Web Title: Fireworks display at Malegaon cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.