हार्डवेअर दुकानास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:53 PM2018-10-13T17:53:17+5:302018-10-13T17:54:11+5:30
येवला तालुक्यातील राजापूर येथील श्री हार्डवेअर दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रु पयांचा माल जळून खाक झाल्याची घटना घडली.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील श्री हार्डवेअर दुकानास शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रु पयांचा माल जळून खाक झाल्याची घटना घडली. राजापूर येथे विजेचा नेहमी खेळखंडोबा झाला असून, वीजपुरवठा अनियमित होत असल्याने विजेच्या कमी जास्त दाबामुळे या दुकानात शॉर्टसर्किटने आग लागली व येथील बऱ्याच गृहोपयोगी वस्तू जळाल्या आहेत. विजेच्या जादा दाबामुळे असा प्रकार घडल्याचे वीज वितरणच्या कर्मचाºयांनी सांगितले. या आगीत दुकानातील इन्व्हर्टर, इलेक्ट्रिक वजन काटा, पीओपी, दहा एलइडी बल्ब, पंखे, रंगाचे डबे, वायर बंडल, सोनी टीव्ही, एलइडी ट्यूब, सीसीटीव्ही, मशीन मीटर व इतर कागदपत्रे असे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दुकानाचे मालक समाधान आव्हाड यांनी पोलिसात तक्र ार दाखल केली. विद्युत वितरणचे सहायक अभियंता सूरजकुमार हुरपडे, तलाठी रोखले, पोलीस हवालदार सुरासे यांनी पंचनामा केला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दुकान सुरू केले अन् त्यात मोठे संकट उभे राहिल्याने श्री हार्डवेअरचे संचालक हवालिदल झाले असून या प्रकरणी नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.