फटाके विक्रेत्यांना लवादाचा दणका

By Admin | Published: October 18, 2016 02:25 AM2016-10-18T02:25:16+5:302016-10-18T02:40:38+5:30

कचऱ्याची विल्हेवाट : स्वच्छ पर्यावरण शुल्क करणार वसूल

Fireworks sellers | फटाके विक्रेत्यांना लवादाचा दणका

फटाके विक्रेत्यांना लवादाचा दणका

googlenewsNext

नाशिक : दिवाळीत शहरभर फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, त्यापासून रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट याबाबत महापालिका उपाययोजना करत आली आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने आता फटाक्यांपासून होणाऱ्या कचऱ्याकरिता फटाके विक्रेत्यांनाच जबाबदार धरत त्यांच्याकडून स्वच्छ पर्यावरण शुल्क म्हणून तीन हजार रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी शहरात २५८ गाळे उभारणीस महापालिकेला परवानगी दिली आहे.
दिवाळीत शहरात कोट्यवधी रुपयांचा धूर निघतो. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणावर कचराही रस्त्यांवर साचतो. दिवाळीच्या काळात घंटागाड्यांमार्फत सदर कचरा उचलताना कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येते. शिवाय, ध्वनी व वायू प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवाद आणि उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर निकाल देत फटाक्यांपासून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता फटाका विक्रेते, एजन्सी व दुकानदार यांच्याकडून स्वच्छ पर्यावरण शुल्क म्हणून प्रत्येकी ३००० रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने सर्व विक्रेत्यांना नोटीस काढत सदर शुल्क भरणे बंधनकारक केले आहे. डोंगरे वसतिगृह मैदानासह खासगी जागांवरही व्यवसाय करणाऱ्या फटाका विक्रेत्यांना सदर शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, महापालिकेने शहरात २५८ गाळ्यांसाठी लिलाव काढले आहेत. त्यात गोल्फ क्लब- ४०, राणेनगर सिडको- १०, संदीप हॉटेल समोर १०, तपोवन साधुग्राम- २०, गौरी पटांगण- १५, चेहेडी रस्ता- २०, नाशिकरोडवरील के. एन. केला हायस्कूलजवळ ४०, गाडेकर मळ्यासमोर २०, शिवाजीनगर मैदान- ८, उपनगर येथील शाळा क्रमांक १२५ जवळील जागेवर ३०, सातपूर क्लब हाऊस- १०, सिडको लेखानगर- १०, राजे संभाजी स्टेडिअम- १५ याप्रमाणे गाळ्यांचा समावेश आहे. सदर गाळेधारकांना स्वच्छ पर्यावरण शुल्कासह सेवाकर, अग्निशमन ना हरकत शुल्क आदि रक्कमही मोजावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fireworks sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.