पोलिसांकडून हवेत गोळीबार

By admin | Published: August 31, 2016 01:03 AM2016-08-31T01:03:12+5:302016-08-31T01:13:59+5:30

थरारनाट्य : युवकांचा सिनेस्टाइल पाठलाग; राजराजेश्वरी चौकात पकडले

Firing in the air from the police | पोलिसांकडून हवेत गोळीबार

पोलिसांकडून हवेत गोळीबार

Next

नाशिकरोड : नांदुरनाका येथे मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांना बघून दुचाकीवरून धूम ठोकणाऱ्या संशयितांचा पाठलाग करताना पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याची घटना येथील राजराजेश्वरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. केवळ पोलिसांना पाहून पळण्याच्या चुकीमुळे पोलिसांचाही संशय बळावला आणि सुरू झाले पाठलाग नाट्य...
अपघातात जखमी झालेल्या मित्राला भेटून सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अ‍ॅक्टिव्हा, पल्सर, हिरो होंडा स्प्लेंडर या तीन दुचाकीवरून ६-७ युवक जत्रा हॉटेलकडून नांदुरनाक्याकडे येत होते. यावेळी आडगाव पोलीस ठाण्याचे बीटमार्शल व गस्ती पथकाचे वाहन गस्त घालत असताना पोलिसांना बघून दुचाकीवरील युवक नांदुरनाक्याच्या दिशेने सुसाट पळाले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. ते युवक नांदुरनाक्याकडून जेलरोडच्या दिशेने पळाल्याने पोलिसांनी पाठलाग करत सदर घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने बिनतारी संदेश यंत्रणेवरून सदर घटनेची माहिती देताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे बीटमार्शल गणेश गोसावी, मोहन संगमनेरे हे जेलरोड पवारवाडी येथून दसक स्मशानभूमी येथे दुचाकी अडविण्यास उभे राहिले, परंतु त्या दुचाकीवरील युवकांनी हुलकावणी देत तेथूनही पळ काढला. बीटमार्शल गोसावी व संगमनेरे यांनी लागलीच त्या युवकांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एकाने आपली दुचाकी पंचक रस्त्याकडे वळविली तर इतर दोन्ही दुचाकींवरील युवक बिटकोच्या दिशेने जाऊ लागले. अन् पोलीस झाले निश्चिंतसंबंधित तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच अ‍ॅक्टिव्हा व स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेलेल्या या युवकांना आणून खातरजमा केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र भरधाव वेगात वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना, गाडीचा विमा नाही, पोलिसांना न जुमानता पळून गेले म्हणून राज मणियार व नदीम सय्यद यांच्यावर नाशिकरोड पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाई : पोलिसांच्या भीतीने त्यांनी काढला पळपोलिसांनी संशयास्पद दुचाकीवरून पळून जाणाऱ्या युवकांना पकडण्यासाठी हवेत गोळीबार करून पकडल्याचे समजल्यानंतर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिरोहोंडा स्प्लेंडर (एमएच १५ एझेड ७२६३) हिच्यावरून पळून जाणारे राज अन्वर मणियार (रा. लोहार गल्ली), नदीम अल्ताफ सय्यद (रा. धनगर गल्ली, देवळालीगाव) या दोघांची कसून चौकशी केली असता ते व त्याचे मित्र एकलहरारोड येथे अपघातात जखमी झालेल्या मित्रास भेटण्यास गेले होते. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसल्याने पोलीस कारवाई करतील म्हणून घाबरून पळत असल्याचे उघडकीस आले.

Web Title: Firing in the air from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.