पंचवटीत युवकावर गोळीबार

By admin | Published: June 23, 2016 11:24 PM2016-06-23T23:24:28+5:302016-06-23T23:25:14+5:30

एकाची प्रकृती चिंताजनक : भरदुपारी घडलेल्या घटनेने घबराट; आठवडाभरात शहरातील तिसरी घटना

Firing on a young man in Panchavati | पंचवटीत युवकावर गोळीबार

पंचवटीत युवकावर गोळीबार

Next

नाशिक : दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टकलेनगर कॉर्नरवर महाविद्यालयांच्या परिसरात एका युवकावर गावठी कट्ट्यातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने गोळीबार केल्याची घटना घडली. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून, राहुल टाक हा गंभीर जखमी झाला आहे. आठवडाभरात शहरातील गोळीबाराची ही तिसरी घटना असून, पंचवटी भागातील दुसरी घटना आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टकलेनगर कॉर्नर परिसर येथील विविध महाविद्यालयांमुळे तरुणांचा ‘कॉलेज कट्टा’ बनलेला आहे. गुरुवारी (दि.२३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास संशयित सुशांत वाबळे, राहुल कदम, मनोज पवार, किरण पवार आदिंनी रोहन शिंदे, अमित देसले, इस्माइल शेख, राहुल टाक, सनी पाटील, रिझवान शेख, राहुल मोरे यांना मारहाण केली. यावेळी संशयित वाबळे याने जवळच्या गावठी कट्ट्याने शिंदेच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी शिंदे याने वाबळेला पाठीमागे ढकलल्याने बंदुकीतून सुटलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या राहुल टाक याच्या डोक्याला लागली. त्यामुळे टाक गंभीर जखमी झाला. त्याला मित्रांनी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. संशयित व फिर्यादी रोहन सुरेश शिंदे आपल्या मित्रांसमवेत जुना वाद मिटविण्यासाठी येथे एकत्र आले होते. शिंदे याचा भाऊ विवेकचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते.

Web Title: Firing on a young man in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.