आरटीईअंतर्गत पहिलीला १२६ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:32+5:302021-03-10T04:15:32+5:30

विद्यार्थ्यांच्या राखीव जागांसाठी आरटीई २५% प्रवेशप्रक्रियेस सुरुवात २१मार्चपर्यंत मुदत लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत ...

The first 126 students will get admission under RTE | आरटीईअंतर्गत पहिलीला १२६ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

आरटीईअंतर्गत पहिलीला १२६ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Next

विद्यार्थ्यांच्या राखीव जागांसाठी आरटीई २५% प्रवेशप्रक्रियेस सुरुवात

२१मार्चपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क

इगतपुरी : मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत सन २०२१-२२ या वर्षाच्या आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील एकूण १९ शाळांमध्ये इयत्ता १ लीच्या वर्गासाठी १२६ विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने खासगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसंचलित शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. इयत्ता पहिलीच्या पटसंख्येच्या २५ टक्के जागा आरटीईअंतर्गत प्रवेशाकरता आरक्षित ठेवल्या असून इगतपुरी तालुक्यातील १९ शाळांमध्ये १२६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने सोडतीद्वारे निवड केली जाते. त्यामुळे पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची २१ मार्च २०२१ पर्यंत असून इगतपुरी तालुक्यातील पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व प्रवेशाकरिता संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी माधुरी कांबळे, विस्तार अधिकारी अशोक मुंढे यांनी केले आहे.

इन्फो

शाळा व उपलब्ध जागा

इगतपुरी तालुक्यातील प्रवेशाकरिता उपलब्ध शाळा व जागांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. असीमा बालशैक्षणिक केंद्र इगतपुरी ८, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल भरवीर बु. ३,आनंद इंग्लिश मीडियम स्कूल घोटी २, नित्यानंद इंग्लिश मीडियम स्कूल ९, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घोटी ९, आर्य इंग्लिश मीडियम स्कूल घोटी १३, राजलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल गोंदे ११, प्रियदर्शिनी स्कूल कवडदरा ७, फिनिक्स मुंढेगाव ८, चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल साकुर २, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम साकुर ६, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे ३, चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे १, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल साकुर ६, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे ३, स्पीडवेल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे ९, एंजल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे ५, सिद्धकला इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे २, अभिनय बालमंदिर इगतपुरी ३, पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूल टाकेघोटी ९, लिटल ब्लॉसम इगतपुरी १६.

Web Title: The first 126 students will get admission under RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.