आधी एकच वादा अजित दादा आणि आता राष्ट्रवादीला टाटा
By संजय पाठक | Published: June 24, 2023 11:15 AM2023-06-24T11:15:55+5:302023-06-24T11:17:34+5:30
पुढील पिढीने अनेक पक्षांतरे केली आहेत.
संजय पाठक, नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये अजितदादा पवार यांचे समर्थक राहून फेसबुक वर एकच वादा अजितदादा अशी ताजी पोस्ट टाकणारे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे ठाकरे गटाच्या मार्गावर असून त्यांनी मुंबईत खासदार संजय राऊत यांची भेटे घेतल्याचे वृत्त आहे. नाशिक मधील हिरे घराणे हे परंपरागत काँग्रेस पक्षाचे पाईक होते. मात्र पुढील पिढीने अनेक पक्षांतरे केली आहेत.
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघातून डॉ. अपूर्व हिरे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्यानंतर सध्या ते राष्ट्रवादी मध्ये असून गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या माध्यमातून नाशिक पश्चिम मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता दरम्यान अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वय हिरे यांनी अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केला त्यानंतर त्यांना पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मालेगाव येथे लढण्याचे बळ देण्यासाठी ठाकरे गटाने उपनेते पदही दिले त्यांच्या पाठोपाठ आता अपूर्व हिरेही सेनेच्या ठाकरे गटाच्या मार्गावर असून अद्वय आणि अपूर्व या दोघा बंधूंनी संजय राऊत यांची भेट घेतली. आगामी काळात विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसाठीअपूर्व हिरे हे ठाकरे गटाकडून लढण्याची तयारी करीत आहेत. ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनीही अपूर्व हिरे हे लवकरच ठाकरे गटात दाखल होणार असल्याचे सांगितले.