चांदोरी येथील पहिली बाधित महिला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 08:56 PM2020-06-23T20:56:11+5:302020-06-23T20:56:48+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील पहिली कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदोरी : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील पहिली कोरोना रुग्ण ठणठणीत बरी झाल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
चांदोरी येथील ६० वर्षीय महिला रुग्ण सोमवारी कोरोनावर मात करीत ठणठणीत बरी झाली. तिचे चांदोरी गावात आगमन होताच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक व नागरिकांनी फुले उधळत आणि टाळ्या वाजवून स्वागत केले. कोरोना लक्षण जाणवत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मुकुंद सवाई यांनी या महिलेला शासकीय रु ग्णालयात पाठविले होते.
१४ जून रोजी या महिलेचा नमुना हा पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कातील २१ व्यक्तींना गृहविलगीकरण करण्यात आले होते. अतिसंपर्कातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहे. तीनही नमुने निगेटिव्ह आले.
तसेच कोरोनामुक्त झालेल्या महिलेमुळे चांदोरीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या गावात एक कोरोना रुग्ण आहे व त्यांच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आहे व अहवाल प्रलंबित आहे. चांदोरीत कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती़...अन् महिलेला अश्रू अनावरसदर महिला सात दिवस कोरोनाशी झुंज देऊन यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाली. ती महिला आठ ते दहा दिवसांनंतर आश्रमात परतल्या व आपल्या सोबतच्या व्यक्तींना बघून त्यांना अश्रू अनावर झाले.