रेडक्रॉसच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:33 PM2019-09-14T22:33:22+5:302019-09-15T00:19:40+5:30

अपघातापासून ते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जर उत्तम दर्जाचा प्रथमोपचार मिळाला तर संभाव्य मृत्युंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू टाळता येतात. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने प्रथमोपचाराचे किमान प्रशिक्षण घेतले पाहिजे. अगदी गृहिणींनीदेखील असे ज्ञान घेतल्यास घरातील छोट्या-मोठ्या अपघातांपासून विशेषत: लहान मुलांचे प्राण आपण वाचवू शकतो. प्रथमोपचार दिनाची प्रथा हे या दृष्टीने उचललेले चांगले पाऊल आहे, असे प्रतिपादन रेडक्र ॉस वैद्यकीय अधिकारी व प्रथमोपचार प्रशिक्षक डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले.

First Aid training on behalf of the Red Cross | रेडक्रॉसच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण

प्रथमोपचार दिनानिमित्त रेडक्रॉसच्या नाशिक शाखेच्या वतीने प्रथमोपचार प्रबोधन उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रात्यक्षिक सादर करताना डॉ. प्रतिभा औंधकर. समवेत राखी शर्मा, चंद्रकांत गोसावी आदी.

googlenewsNext

नाशिक : अपघातापासून ते वैद्यकीय मदत मिळेपर्यंत जर उत्तम दर्जाचा प्रथमोपचार मिळाला तर संभाव्य मृत्युंपैकी अर्ध्याहून अधिक मृत्यू टाळता येतात. यासाठी आपल्यातील प्रत्येकाने प्रथमोपचाराचे किमान प्रशिक्षण घेतले पाहिजे. अगदी गृहिणींनीदेखील असे ज्ञान घेतल्यास घरातील छोट्या-मोठ्या अपघातांपासून विशेषत: लहान मुलांचे प्राण आपण वाचवू शकतो. प्रथमोपचार दिनाची प्रथा हे या दृष्टीने उचललेले चांगले पाऊल आहे, असे प्रतिपादन रेडक्र ॉस वैद्यकीय अधिकारी व प्रथमोपचार प्रशिक्षक डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने प्रथमोपचार दिनानिमित्त पालकांसाठी प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन केले होते. यावेळी औंधकर यांनी उपस्थिताना जखमा, भाजणे, घशात वस्तू अडकणे, कीटकदंश, तापातील झटके, बेशुद्धी आदींवरचे प्रथमोपचार तसेच बडेजेस, कृत्रिम श्वसन यांची प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी रेडक्र ॉस सचिव मेजर पी. एम. भगत, शशिकांत शर्मा, चंद्रकांत गोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: First Aid training on behalf of the Red Cross

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.