आधी बसतो चटका मग मिळते सावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 06:26 PM2019-04-29T18:26:08+5:302019-04-29T18:27:09+5:30

सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे.

First of all, the taste gets shadow | आधी बसतो चटका मग मिळते सावली

आधी बसतो चटका मग मिळते सावली

googlenewsNext
ठळक मुद्देपारा चढला आकाशी : जनावरांच्या पाण्यासाठी पशुपालकांची पायपीट

सिन्नर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे. दुपारी उन्हाच्या चटक्यांनी सगळ््यांनाच सावलीची आसरा घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे. ‘आधी बसतो चटका, तवा मिळते सावली’ असा अनुभव ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी व पशूपालकांना येऊ लागला आहे.
दुपारी उन्हाच्या झळा वाढू लागल्याने शेत-शिवारात काम करणारे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक यांना सावलीची गरज वाढू लागली आहे. आंबा, लिंब, चिंच अशा डेरेदार वृक्षांच्या पसरलेल्या छायेत गाई-गुरे, वासरे आसरा घेऊ लागली आहेत. तर काही ठिकाणी जवळपास डेरेदार वृक्ष नसल्याने पर्णहिन वृक्षांखाली जनावरे विसावताना चित्र आहे. पाण्यासाठी पशूपालकांची पायपीट वाढली आहे. होळीपासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागते व गुढीपाडव्याला उचांकं गाठला जातो असा अनुभव आहे.
तथापि, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचे रूप पालटू लागले असल्याने बेमोसमी पाऊस, उन्हाळ्यात - हिवाळा आणि पावसाळ्यात दोन्ही ऋतंूचे हवामान असा विचित्र अनुभव सर्वत्र येत आहे. दिवसभर उन्ह भाजून निघत असले तरी पहाटे गारवा निर्माण होतो. होळी पर्यंत उन्हाची तीव्रता फारशी नसते तथापि, पौर्णिमेनंतर दिवसही अधिक मोठा भासू लागतो. होळी पेटली की, थंडी कमी होते असा जुन्या लोकांचा अनुभव असल्याने आजही तसे म्हटले जाते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हं तापू लागले आहेत.
एप्रिलच्या मध्यावर तालुक्यात गारपीट व वादळी वाºयाचा तडाखा बसला होता. भाजीपाला वर्गीय पिकांचीही तीच परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवावी लागली. ज्या भागात मजूरांच्या सहाय्याने सोंगणी करावी लागत आहे. त्या भागात उन्हाच्या काहीलीने शेती काम करणाºया मजुरांची लाहीलाही होत आहे. तसेच शिवारात शेळ्या - मेंढ्या, गायी - गुरे चारणाºया गुराख्यांनी दुपारच्या उन्हात जनावरांसह सावलीला बसणे पसंत केले आहे. उन्हामुळे पावसाळ्यातील हिरवे गवत करपून केले असून जनावरांना शिवारात हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. शिवारातील हिरवा चाराही संपुष्टात आला असून, शेळ्या - मेढ्यांना चाºयासाठी अधिक दूरवर फिरवावे लागत आहे. शहरातील नागरिकही उकाड्याने हैराण झाले असून उन्हामुळे पंखे, कुलर यांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर टोप्या अथवा उपरणे यांचा वापर वाढला आहे.

Web Title: First of all, the taste gets shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.