झेंडूंचा जिल्ह्यातील पहिला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:42 PM2017-09-28T23:42:01+5:302017-09-29T00:09:05+5:30

चांदवड बाजार समितीत जिल्ह्यातील पहिला झेंडू फुलाचा लिलाव झाल्याची माहिती चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली.

First Auction of Zenduwa District | झेंडूंचा जिल्ह्यातील पहिला लिलाव

झेंडूंचा जिल्ह्यातील पहिला लिलाव

Next

चांदवड : चांदवड बाजार समितीत जिल्ह्यातील पहिला झेंडू फुलाचा लिलाव झाल्याची माहिती चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली.
चांदवड बाजार समिती आवारावर बुधवारी (दि. २७) बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक विलासराव ढोमसे यांच्या शुभ हस्ते फुलांच्या लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, लिलावाच्या पहिल्याच दिवशी १००० क्र ेट्स झेंडूच्या फुलांची आवक झाली असून, कमाल भाव प्रति क्विंटल (पिवळा) ५३०० (लाल)-४४०० व सरासरी भाव ४००० रु पये मिळाले. यावेळी तालुक्यातूनच नव्हे, तर बाहेरील तालुक्यातूनदेखील शेतकºयांनी फुले विक्र ीस आणलेली होती. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जोडशेती म्हणून झेंडू फुलांचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. परंतु फूल उत्पादन झाल्यानंतर शेतकºयांसमोर फुले विक्र ीसाठी मोठा पेच पडायचा, तसेच फुले विक्री करताना शेतकºयांची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक फसवणूक होत असे. याकरिता बाजार समितीने दोन वर्षांपासून हंगामी झेंडूच्या लिलावास सुरु वात केलेली आहे. लिलाव शुभारंभप्रसंगी संचालक पंढरीनाथ खताळ, अण्णासाहेब आहेर, निवृती घुले, विक्र म मार्कंड, चंद्रकांत व्यवहारे, प्रवीण हेडा, पूजा ठाकरे, जी. एन. गांगुर्डे, एच. एल. पानसरे, बी. बी. वाघ, रघुनाथ काळे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील जगताप, जितेंद्र जैन, रुपेश मिसर व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. फुले विक्र ीची रक्कम रोख स्वरूपात अदा करण्यात येत असून, फुले क्रेट्समध्ये विक्रीस आणावी, फुले बाजार संदर्भात काही सूचना असल्यास त्वरित बाजार समिती कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन सभापती आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर व सर्व संचालक मंडळाने केले.

Web Title: First Auction of Zenduwa District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.