नाशिक जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार डॉ. विनय ठकार यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 09:53 AM2020-10-29T09:53:03+5:302020-10-29T09:53:24+5:30
नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे आज नाशिक मधील संस्थेच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.
नाशिक- जिल्ह्यातील पहिले हृदयरोग तज्ञ, निसर्ग प्रेमी छायाचित्रकार आणि अनेक संस्थांचे आधारस्तंभ डॉ विनय ठकार यांचे अल्पशा आजाराने आज मध्यरात्री निधन झाले ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. प्रतिभा आणि एक मुलगा व मुलगी असा परिवार असून
त्यांचे सुपुत्र डॉ चारुहास ठकार हे अमेरिकेत सिनसिनाटि विद्यापीठात जगप्रसिध्द किडनी विकार तज्ञ आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ विनय ठकार यांनी नाशिक जिल्ह्यात अनेक आधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. निष्णात हृदयरोग तज्ञाबरोबरच ते उत्तम छायाचित्रकार होते. त्यांच्या संग्रहात लक्षावधी फोटो होते. मुलांमध्ये निसर्गप्रेम वाढावे म्हणून शेकडो स्लाईड शो केले. त्यासाठी संपूर्ण अनेक देशांत प्रवास केला होता. नाशिक मधील पक्षीमित्र आणि वन्यजीव प्रेमी म्हणूनही ते सुपरिचित होते.नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे ते विश्वस्त मंडळ सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे आज नाशिक मधील संस्थेच्या सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.