चांदवड तालुका विभागात प्रथम

By admin | Published: January 16, 2017 01:02 AM2017-01-16T01:02:47+5:302017-01-16T01:03:01+5:30

नाशिक : जलयुक्त शिवार अभियान

First in Chandwad taluka section | चांदवड तालुका विभागात प्रथम

चांदवड तालुका विभागात प्रथम

Next

चांदवड : सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१४- १९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्यात आले असून, याअंतर्गत प्रथम टप्प्यात तालुक्यातील २२ गावांची निवड झाली आहे. निवड झालेल्या गावांतील पिकांचे व पिण्याच्या पाण्याची गरज, पडणारा पाऊस, भौगोलिक क्षेत्र आदि बाबींच्या आधारे प्रत्येक गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. जुन्या कामाची दुरुस्ती, जुन्या तलावातील गाळ काढणे व गरजेनुसार माथा ते पायथा संकल्पनेनुसार पाणलोट क्षेत्रात करावयाचे विविध नवीन उपचार यात सलग समतल चर, ओघळ नियंत्रण, बांध बदिस्ती, दगडी बांध, माती नाला बांध, शेततळे, विहीर पुनर्भरण, जलभंजन, सीमेंट बंधारे आदि कामांचे नियोजन करून शासनाच्या विविध कार्यकारी यंत्रणेमार्फत ती राबविणेकामी अंमलबजावणी करण्यात आली. प्रथमदर्शनी तांत्रिक निकषाने निवडलेल्या गावांमध्ये शिवार फेरी काढून प्रत्यक्षात गावकऱ्यांसमवेत कामांची क्षेत्रीय स्तरावर निवड करून त्यास ग्रामसभेद्वारे मंजुरी घेण्यात आली. त्यानुसारच यंत्रनिहाय करावयाच्या विविध कामांचा २२ गावांचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या आराखड्यास मान्यता घेण्यात आली. त्यानुसारच क्षेत्रीय स्तरावर कामांचे अंदाजपत्रके इत्यादि बाबी परिपूर्ण करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. सदर योजने अंतर्गत विविध कामांची अंमलबजावणी शासनाचे विविध योजना, लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत आर्ट आॅफ लिव्हिंग , साई संस्थान (शिर्डी) , महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, जैन सोशल ग्रुप आदिंच्या कार्यक्षेत्र सहभागातून अभियान यशस्वी करण्यात आले. चांदवड तालुक्यातील आडगाव येथे जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. (वार्ताहर)

 

Web Title: First in Chandwad taluka section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.