जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ‘निगेटिव्ह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:16 PM2020-04-11T23:16:23+5:302020-04-12T00:36:05+5:30

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रु ग्ण ठरलेल्या निफाड तालुक्यातील व्यक्तीच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती झाल्यानंतर त्यांचे फेरतपासणीचे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 First Coronation-bound 'Negative' in the District! | जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ‘निगेटिव्ह’!

जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित ‘निगेटिव्ह’!

googlenewsNext

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रु ग्ण ठरलेल्या निफाड तालुक्यातील व्यक्तीच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती झाल्यानंतर त्यांचे फेरतपासणीचे तिन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अखेरचा निगेटिव्ह अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाल्यानंतर हा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले. हा रुग्ण नाशिकमधील पहिला कोरोनाबाधित तसेच पहिला कोरोनामुक्त व्यक्ती ठरल्याने आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांना पहिली यशाची किनार लाभली आहे.
निफाड तालुक्यातील ही व्यक्ती २८ मार्चला कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत आढळून आले होते. त्यापूर्वी दोन दिवस तो रुग्ण नाशकात येऊन दाखल झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांना दोन आठवड्यांच्या प्रयत्नांती सकारात्मक फळ लाभले आहे. त्याच्या प्रकृतीत गत दहा दिवसांपासून अत्यंत चांगली प्रगती सुरू होती. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गत आठवड्याच्या तुलनेत त्याची प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्याच्या नमुन्याची पहिली तपासणी करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात तो रु ग्ण अगदी व्यक्तीप्रमाणे श्वसन करीत असल्याने त्याला कोणताही कृत्रिम श्वासोच्छ्वास लावण्यात आलेला नव्हता. आहार-विहारातदेखील त्याने सातत्याने समाधानकारक प्रगती साधली होती. त्यानंतर शुक्रवारी त्याची दुसऱ्यांदा फेरतपासणी करण्यात आली. नाशिकमधील तज्ज्ञ डॉक्टर्सनी राज्य आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत प्रभावीपणे त्याच्यावरती उपचार केले. त्या सर्व बाबींचा परिणाम म्हणूनच पहिल्या पॉझिटिव्ह रु ग्णाच्या प्रकृतीत अत्यंत वेगाने सकारात्मक बदल घडून आले. त्याशिवाय मालेगावातील अन्य तीन कोरोना संशयितांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
----------------------
दोन वेळा होणार तपासणी
आंतरराष्ट्रीय निर्देशानुसार एकदा पॉझिटिव्ह आलेल्या रु ग्णाच्या थुंकीच्या नमुन्याची दोन वेळा तपासणी करावी लागते. त्यानुसार बुधवारी पहिल्यांदा त्या रु ग्णाच्या नमुन्याची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गुरु वारी पुन्हा एकदा नमुन्याची तपासणी केली जाऊन दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, तरीदेखील तपासणी करणाºयांनी दुसºया अहवालाबाबत साशंकता व्यक्त केल्याने त्याचा तिसºयांदा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला. अखेरीस शनिवारी रात्री हा नमुनादेखील निगेटिव्ह असल्याचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने त्याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
----------------
जिल्हाधिकाºयांनी केले कौतुक
नाशिकमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णावर अत्यंत योग्यपद्धतीने उपचार करीत तसेच त्याबाबतच्या सर्व आदर्श नियमावलीचे पालन करीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे तसेच सिव्हीलमधील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, सहाय्यकांनी बजावलेल्या सेवेचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कौतुक केले आहे. तसेच अशाच प्रकारे अव्याहतपणे कार्यरत राहण्याचे आवाहनदेखील जिल्हाधिकाºयांनी केले.

Web Title:  First Coronation-bound 'Negative' in the District!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.