उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:34 PM2020-12-23T21:34:31+5:302020-12-24T00:55:55+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

First day of filing of candidature application | उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक

उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक

Next
ठळक मुद्देशेवटच्या तीन दिवसांत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा पहिला दिवस होता. मात्र बुधवारी (दि. २३) एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

त्र्यंबक तालुक्यातील शिवाजीनगर, पेगलवाडी ना. व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दि.२३ ते ३० डिसेंबरपर्यंत (दि.२६ ते २८पर्यंतच्या सुट्या वगळता) आहे. शेवटच्या तीन दिवसांत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांत आज युवकांची संख्या अधिक दिसून आली.

 

Web Title: First day of filing of candidature application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.