उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:10 PM2020-03-08T22:10:31+5:302020-03-08T22:12:08+5:30

येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.

First day of filing a nomination | उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

उमेदवारी दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक

googlenewsNext
ठळक मुद्देयेवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाºया २५ ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान होणार आहे. ६ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार असल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नवीन प्रशासकीय तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात व्यवस्था केली आहे. १२ मार्चला संकष्टी चतुर्थी आणि १३ मार्चला रंगपंचमी असल्याने अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशन विक्र ी व अर्ज दि. ६ ते १३ मार्च दरम्यान सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी १८ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना चिन्ह देण्यात येणार आहे व त्याच दिवशी अंतिमरीत्या निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ग्रामपंचायतींसाठी दि. २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपावेतो मतदान घेण्यात येणार असून, ३० मार्च रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. असा भरावा लागेल उमेदवारी अर्ज हस्तलिखित अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाणार नसून निवडणूक आयोगाने संकेतस्थळ विकसित केले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांना या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून नामनिर्देशनपत्रे भरावी लागणार आहेत. त्यानंतर आॅनलाइन नामनिर्देशनपत्राची छापील प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विहित मुदतीत सादर करावी लागणार आहे. सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांना आॅनलाइन फॉर्म, आॅनलाइन मालमत्ता दायित्व, गुन्हेगार नसल्याचे घोषणापत्र द्यायचे आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वय २१ वर्ष असावे. राखीव जागेसाठी शंभर, तर सर्वसाधारण जागेसाठी ५०० रुपये अनामत असून, १०० रुपयांच्या मुद्रांकावर २००१ नंतर तिसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहून द्यावे लागणार आहे. या ग्रामपंचायतींचा
वाजला बिगूल देवळाणे, अंगुलगाव, तळवाडे-कौटखेडे, भुलेगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव, वडगावबल्हे, बोकटे, आहेरवाडी-लहित-हाडपसवरगाव-जायदरे, खरवंडी-देवदरी, रहाडी, भारम, रेंडाळे, न्याहरखेडे खुर्द, न्याहरखेडे बुद्रुक, कोळगाव-वाईबोथी, अनकुटे-सावखेडे, डोंगरगाव-पिंपळखुटे खुर्द, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे-पिंपळखुटे तिसरे, धामोडे, कुसमाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे.

Web Title: First day of filing a nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.