नूतनवर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक देवतांच्या चरणी लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:13+5:302021-01-02T04:13:13+5:30

देवाच्या चरणी माथा टेकविण्यासाठी धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक भूमीत परराज्यातील भाविक आवर्जून दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून गुजरात, मुंबईकडील ...

On the first day of the new year, thousands of devotees follow in the footsteps of the deities | नूतनवर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक देवतांच्या चरणी लीन

नूतनवर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक देवतांच्या चरणी लीन

Next

देवाच्या चरणी माथा टेकविण्यासाठी धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक भूमीत परराज्यातील भाविक आवर्जून दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून गुजरात, मुंबईकडील भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी, त्यांचे वास्तव्य असलेली पंचवटी, तसेच रामकुंडाचे धार्मिक महत्त्व, शक्तिपीठ खान्देशची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता यासह नाशिकमधील धार्मिकस्थळांवर भाविक नववर्षाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. शहरातील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर, सोमेश्वर, नवश्या गणपती, एकमुखी दत्त या धार्मिक स्थळांवरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. पंचवटीतील सीता गुंफा, तसेच त्रिवेणी संगमावरही भाविकांनी भेट दिली. गोदाकाठी असलेली पुरातन मंदिरे, तसेच नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकनगरीत भाविकांनी देवदर्शन घेत, नव्या वर्षाचा प्रारंभ केला.

वणीत भाविकांची रीघ

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ७० ते ८० हजार भाविकांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेतला. ३१ डिसेंबरच्या दिवशी मंदिर २४ तास उघडल्यामुळे धुळे, जळगाव, नगर, नाशिक, मुंबई, पनवेल खारघर, पेण, अलिबाग, गुजरात, सुरत, वासदा, नवसारी, राजपिपला, मुहवा या भागातील भाविक रात्रीच सप्तश्रृंगी गडावर दाखल झाले होते. यावेळी भाविकांच्या गर्दीमुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

त्र्यंबकला गर्दीत वाढ

भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ आज दिवसभर सुरूच होता. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील हॉटेल, लॉज, तसेच अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडल्याचे दिसून आले. वाहनतळावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

(फोटो मेलने पाठविले आहेत. फोटोनेम -०१ टिबीके२, ०१ सप्तशृंगी १, ०१पीएचजेएन ६७)

Web Title: On the first day of the new year, thousands of devotees follow in the footsteps of the deities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.