सिन्नर तालुक्यातील आडवाडी पहिली ग्रीन एनर्जी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:43 PM2019-01-28T16:43:30+5:302019-01-28T16:49:11+5:30
सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात शेवटचे टोक असणाऱ्या आडवाडी (मधली) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तालुक्यातील पहिली ग्रीन एनर्जीयुक्त शाळा बनली आहे.
विकास संस्थेचे अध्यक्ष मंदा बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य वनिता शिंदे , सरपंच मुक्ता बिन्नर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दारोली, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, तालुक्याचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, सहाय्यक अभियंता देविदास पाचपांडे, राजेंद्र शिंदे, सुधाकर ठुबे, सतीश शिरोळे, दिलीप खताळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ आधिकारी वर्गाने स्वखर्चाने आडवाडी (मधली) शाळेला एक लाख रूपये किंमतीचे सोलर पॉवर किट भेट दिले. मनीष ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. विकास संस्थेचे अध्यक्ष मंदा बिन्नर यांनीही शाळेसाठी एक संगणक भेट दिला आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी हा देखील शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे पुढे जावे यासाठी आपण या भागातील शाळेस सहकार्य करण्यास कटीबध्द असल्याचे बिन्नर यांनी सांगितले. यावेळी सुदाम सदगीर, तुकाराम बिन्नर, गणपत नवले, दिपक उगले, सोमनाथ कराड, अजय कुलकर्णी, दिपक उगले, गणपत नवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.