नाशिक विभागात पहिले, तर राज्यात दुसरे, निकाल ९४.७१ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के

By संकेत शुक्ला | Published: May 21, 2024 10:58 PM2024-05-21T22:58:27+5:302024-05-21T22:58:56+5:30

HSC Exam Result, Nashik: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. उत्तीर्णतेचे प्रमाण बघता यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.

First in Nashik division, second in the state, result 94.71 percent, pass percentage of girls 96.32 percent | नाशिक विभागात पहिले, तर राज्यात दुसरे, निकाल ९४.७१ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के

नाशिक विभागात पहिले, तर राज्यात दुसरे, निकाल ९४.७१ टक्के, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३२ टक्के

- संकेत शुक्ल
नाशिक - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागात नाशिक प्रथम स्थानावर असून, राज्याचा निकाल बघता नाशिक विभागाची टक्केवारी दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. उत्तीर्णतेचे प्रमाण बघता यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात काेकण ९७.५१ टक्के निकालासह प्रथम, तर नाशिक विभाग ९४.७१ टक्के मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक विभागात मुलींचे प्रमाण ९६.३२ टक्के, तर मुलांच्या यशस्वीतेचे प्रमाण ९३.३९ टक्के इतके आहे.

शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मंडळातून १,५७,३४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. यात ८६,४९१ विद्यार्थी, तर ७०,८५४ विद्यार्थिनींचा समावेश हाेता. यात ८०,७७८ विद्यार्थी, तर ६८,२५१ विद्यार्थिनींनी यश मिळविले. मंगळवारी (दि. २१) दुपारपासून बाेर्डाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला हाेता. विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या या निकालाची तारीख बाेर्डाने जाहीर केल्यानंतर परीक्षार्थींची धाकधूक वाढली हाेती. ऑनलाइन निकाल हाती पडल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते.
 
राज्यात नाशिक दुसरे
कोकण ९७.५१
नाशिक ९४.७१
पुणे ९४.४४
कोल्हापूर ९४.२४
संभाजीनगर ९४.८.

Web Title: First in Nashik division, second in the state, result 94.71 percent, pass percentage of girls 96.32 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.