पोलीसपाटलाचे पहिले मानधन विधवा महिलेला

By admin | Published: November 17, 2016 12:07 AM2016-11-17T00:07:16+5:302016-11-17T00:13:10+5:30

आदर्श : मडकीजांब येथे सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन

First lady of the police custody widow widow | पोलीसपाटलाचे पहिले मानधन विधवा महिलेला

पोलीसपाटलाचे पहिले मानधन विधवा महिलेला

Next

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यात गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी पोलीसपाटलांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या. नवनियुक्त पोलीसपाटील भरतीतून अनेक नवीन चेहऱ्यांना ग्रामविकासात ‘पोलीस पाटील’ या मानाच्या व महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटील भरतीत महिला प्रवर्गात सर्वाधिक गुण मिळवणार्या मडकीजांबच्या नवनियुक्त पोलीसपाटील रोहिणी सचिन वडजे यांनी आपले पहिले मानधन व साडी चोळी मडकीजांब गावातील विधवा शेतकरी महिलेला देऊन नवा
आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पोलीसपाटील संघटनेचे प्रांतिक उपाध्यक्ष चिंतामण
पाटील मोरे यांनी पोलीसपाटील संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना केले.
दिंडोरी येथे संघटनेचा जिल्हा मेळावा पार पडला. व्यासपीठावर राज्य संघटनेचे अध्यक्ष पंढरी पाटील (ठाणे), कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे (पुणे), परशुराम कर (गोंदिया), पोलीस उपनिरीक्षक रंजवे, दिंडोरी पत्रकार संघाचे
अध्यक्ष संतोष कथार आदि मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: First lady of the police custody widow widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.