मविप्र करंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात काटकर प्रथम, देशमुख द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:03 AM2019-01-24T01:03:22+5:302019-01-24T01:03:37+5:30

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, पुणे केंद्राचा विद्यार्थी जयंतकुमार काटकर हा मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांकाचा विजेता ठरला. तर आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणेच्या भक्ती देशमुख हिने द्वितीय क्र मांक तसेच शिवराज कदम महाविद्यालय, कोल्हापूरच्या नीतेश रायकर याने तृतीय क्र मांक मिळवला.

 First in the MVP Trophy individual category, Deshmukh II | मविप्र करंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात काटकर प्रथम, देशमुख द्वितीय

मविप्र करंडक स्पर्धेत वैयक्तिक गटात काटकर प्रथम, देशमुख द्वितीय

Next

नाशिक : इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, पुणे केंद्राचा विद्यार्थी जयंतकुमार काटकर हा मविप्र अखिल भारतीय करंडक स्पर्धेत प्रथम क्र मांकाचा विजेता ठरला. तर आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणेच्या भक्ती देशमुख हिने द्वितीय क्र मांक तसेच शिवराज कदम महाविद्यालय, कोल्हापूरच्या नीतेश रायकर याने तृतीय क्र मांक मिळवला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, अध्यक्षस्थानी सरचिटणीस नीलिमा पवार होत्या. व्यासपीठावर उपसभापती राघो अहिरे, संचालक भाऊसाहेब खातळे, नाना महाले, प्रल्हाद गडाख, दत्तात्रय पाटील, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, गुलाब भामरे, परीक्षक डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ. नितीन रिंढे, डॉ. उमेशकुमार, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे, डॉ. एन. एस. पाटील, सर्व प्राचार्य उपस्थित होते.
डॉ. निमसे यांनी सांगितले की, वक्तृत्व स्पर्धेची तयारी करताना विषय, विषयाचा प्रभाव, सादरीकरण श्रोत्यांवर व परीक्षकांवर चांगला प्रभाव होणे अपेक्षित आहे. वक्तृत्व स्पर्धेत वेळेचे व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. स्पर्धा कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी संस्थेच्या विविध उपक्र मांची माहिती दिली. स्पर्धेचा आढावा स्पर्धाप्रमुख डॉ. डी. पी. पवार यांनी घेतला. सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील यांनी केले. संचालक सचिन पिंगळे यांनी आभार मानले.
विजेते स्पर्धक
जयंतकुमार काटकर - एमएसडब्ल्यू, इग्नू पुणे - प्रथम, भक्ती देशमुख - आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे - द्वितीय, नीतेश रायकर - शिवराज कदम महाविद्यालय कोल्हापूर - तृतीय, मराठी विषय : हर्षद आवटे - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक - प्रथम, निकिता पाटील - राज्यशास्त्र विभाग, सा. फुले पुणे - द्वितीय, हिंदी विषय : दिनश मोहम्मद सय्यद - औषधनिर्माणशास्त्र नाशिक - प्रथम, इंग्रजी : प्रसन्ना बच्छाव - एम.एस.जी. महाविद्यालय, मालेगाव - प्रथम, केतन लोबो - केटीएचएम महाविद्यालय, नाशिक - द्वितीय, परीक्षक पुरस्कृत : मनेश अहिरे - एम.एस.जी. महाविद्यालय मालेगाव, आदिती कोठावदे - एम. एस. गोसावी कॉलेज आॅफ फार्मसी नाशिक.

Web Title:  First in the MVP Trophy individual category, Deshmukh II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.