ई-डिस्ट्रिक्टमध्ये राज्यात नाशिक प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 10:27 PM2017-08-04T22:27:43+5:302017-08-05T00:22:16+5:30
डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत डिजिटल प्रमाणपत्राच्या वितरणात नाशिक जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जून महिन्यात राज्यात नाशिक जिल्ह्याने सुमारे एक लाख तीस हजार इतक्या विक्र मी दाखल्यांचे वितरण केले.
पाटोदा : डिस्ट्रिक्ट योजनेअंतर्गत डिजिटल प्रमाणपत्राच्या वितरणात नाशिक जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. जून महिन्यात राज्यात नाशिक जिल्ह्याने सुमारे एक लाख तीस हजार इतक्या विक्र मी दाखल्यांचे वितरण केले. ई-डिस्ट्रिक्ट योजनेस प्रारंभ झाल्यानंतर बºयाच मागे असलेला जिल्हा राज्यात प्रमाणपत्र वाटपात पहिल्या क्रमांकावर आला असून, ई-डिस्ट्रिक्ट योजनेत राज्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
ई-डिस्ट्रिक्ट योजनेस जिल्ह्यात खºया अर्थाने नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरुवात झाली. जिल्ह्यात महा-ई-सेवा केंद्रामार्फत या योजनेला प्रारंभ झाला सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रमाणपत्र उपलब्ध करून देणाºया या उपक्रमाने राज्यात पहिला क्रमांक मिळविण्यासोबतच एक लाख ३० हजारांवर प्रमाणपत्र वितरणाचा उच्चांक गाठला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरिकांना वारंवार लागणारे आणि महत्त्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजिटल पद्धत अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या पद्धतीचा चांगल्या प्रकारे अवलंब करण्यात आल्याने अवघ्या काही महिन्यात या जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे.