पहिले ओव्हरॉल्ड सुखोई वायुसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:13 AM2018-10-27T01:13:23+5:302018-10-27T01:15:21+5:30

भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभाल विभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेले प्रथम सुखोई ३० एमके आय एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी) शुक्रवारी (दि. २६) वायुसेनेला हस्तांतरित केले.

The first overwhelmed Sukhoi Air Force | पहिले ओव्हरॉल्ड सुखोई वायुसेनेत

संपूर्ण भारतीय यंत्रणेने ओव्हरॉल्ड केलेले पहिले सुखोई ३० एमके आय विमान दक्षिण पश्चिम विभागाचे एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना सुपुर्द करताना एअर मार्शल हेमंत शर्मा, एअर कमोडोर समीर बोराडे यांच्यासह वायुसेनेचे जवान.

Next
ठळक मुद्दे११ बीआरडीचे यशओझर येथे दिमाखदार सोहळ्यात हस्तांतरण

नाशिक : भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभाल विभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेले प्रथम सुखोई ३० एमके आय एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ बेस रिपिएर डेपोत (बीआरडी) शुक्रवारी (दि. २६) वायुसेनेला हस्तांतरित केले. ११ बीआरडीला या विमानाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तब्बल १७ ते १८ महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर उर्वरित दोन महिन्यांत यशस्वीरीत्या चाचणी घेऊन हे विमान भारतीय वायुसेनेला सुुपुर्द करण्यात आले आहे.
ओझर ११ बीआरडीच्या इतिहासात २६ आॅक्टोबरचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला आहे. येथे संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणेद्वारे सुखोई-३० एमकेआय संपूर्ण ओव्हरॉल्ड करून ११ बीआरडीने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली असून, शुक्रवारी ओझर येथे औपचारिक सोहळ्याच्या माध्यमातून हे विमान भारतीय वायुसेनेच्या आॅपरेशनल स्वाकडनला सुपुर्द करण्यात आले आहे.
यावेळी एअर कमोडोर समीर बोराडे यांच्यासह वायुसेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयासह नागपूर व दक्षिण पश्चिम विभाग मुख्यालय गांधीनगर येथील वरिष्ठ अधिकारी तसेच एचएएलचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओ, डीजीएक्यूएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संपूर्ण ओव्हरॉल्ड सुखोई-३० एमकेआय विमानामुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढली असून, फेब्रुवारी महिन्यात आणखी एक विमान वायुसेनेला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती एअर मार्शल हेमंत शर्मा यांनी दिली आहे.
५० टक्के मिग २९ चे अद्यावतीकरण
भारतीय वायुसेनेचे मुख्य देखभाल दुरुस्ती केंद्रांपैकी ११ बीआरडी एक असून, येथे मिग-२९, सुखोई-३० एमकेआय, एसयू-७, मिग-२१ व मिग-२८, मिग-२३ सारख्या लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्तीची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहेत. १९८८ मध्ये प्रथम मिग-२३ विमानांची मध्यम व किरकोळ स्वरूपाची देखभाल दुरुस्ती सुरू झाल्यानंतर २४८ मिग-२३ विमानांची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीचे काम २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आले, तर वर्ष १९९६ पासून मिग-२९ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीच्या काम येथे सुरू असून, यातील ५० टक्के विमानांचे अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
निकषांनुसार चाचणी
११ बीआरडीमध्ये सुखोई ३० एमकेआयचे संपूर्ण ओव्हरॉल्ड करून
२४ एप्रिलला यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष रणभूमीवर अपेक्षित प्रदर्शनाच्या निकषांनुसारही या विमानाची चाचणी घेण्यात आली. सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच हे विमान आॅपरेशनल स्क्वॉर्डनमध्ये सामील करण्यात आल्याचे एअर कमोडोर समीर बोराडे यांनी सांगितले.

Web Title: The first overwhelmed Sukhoi Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.