ब्रह्मांडात प्रथम पूजन शिवलिंगाचे
By admin | Published: November 29, 2015 11:02 PM2015-11-29T23:02:30+5:302015-11-29T23:03:22+5:30
श्री गिरीबापू : सांस्कृतिक दर्शन सोहळा
घोटी : भूतलावर तथा पूर्ण ब्रह्मांडात प्रथम पूजन शिवलिंगाचे झाले असून, प्रतिमा मूर्ती व लिंगपूजनाचे विशेष महत्त्व असल्याचे विचार गिरीबापू यांनी व्यक्त केले.
घोटी येथे शिवपुराण ज्ञानयज्ञात चौथ्या दिवशी ते बोलत होते, पुढे गिरी बापू म्हणाले की, या ब्रम्हांडात सार्वभौम असणार्या सर्व देवादी देवांचा वास असणार्या लिंग- पीठ चे महत्व सुंदर अमृतवाणीने त्यांनी विषद करतांना संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
महादेव यांची मूर्ती आकार स्वरूप आहे.लिंग हि सार्वभौम तसेच अथांग, आकार व निराकार , सगुण तथा निर्गुण आहे.सर्व देवादी देवांचा वास शिव लिंगा मधे आहे. लिंग-पीठ हे शिविलंगाचे मूळ आहे. लिंग हे शिव व शक्तीचे प्रतिक असून पीठ हे मातेचे प्रतिक आहे. पूर्ण ब्रम्हांडात प्रथमता पूजन करणारे हे विष्णू प्रथम व्यक्ती आहेत.
लिंग आकाश‘चे स्वरूप असून पीठ हे पृथ्वीचे स्वरूप असल्याने आकाश व पृथ्वीसह सार्वभौम आहे. याभूतलावर अशे कुठलेच तीर्थ नाही कि त्या ठिकाणी शिवचा वास नाही विराजमान नाही. या सृष्टीवर शिविलंगशिवाय धर्म शास्त्र तथा धर्म पुराण सुद्धा होवू शकत नाही . विविध प्रवचना मध्ये शिव प्रथम स्थानी असून शिव मूळ स्वरूप शिव प्रदान आहे . ब्रम्हाजीनी संख्यान विद्यते या भारत वर्षात असे कुठले गाव , नगर तथा शहर स्थापित नाही कि तेथे शिवालय नाही. जितके शिव लिंग पृथ्वीतलावर आहे तितकेच पातळ आणि स्वर्गातसुद्धा आहे.
देव , दानव व मानव हे सर्व लिंग पूजक असून देवादिकामध्ये सुद्धा ब्रम्हा, विष्णू , श्री राम , लंकाधिपती रावण, रामभक्त हनुमान , श्रीकृष्ण हे सर्व शिव तथा लिंग पूजक आहे . राम भक्त हमुमान यांनी शरयू नदीच्या तटावर मानवतेच्या कल्याणाकरिता शिव आराधना केली.
प्रथम लिंगपूजन करणारे ब्रम्हा विष्णू होत.त्यांच्या पूजनाचा दिवस म्हणून महाशिवरात्री पर्व साजरा केला जातो. शिवपूजन तथा शृंगार वेगवेगळ्या पद्धतीचे असून शिविलंगाचे रूप वेगवेगळ्या प्रकारात आहे. बिंदुलिंग, पाषाणलिंग, बांधलिंग, स्पिटकलिंग, सुगंधित शिविलंग, पुष्पलिंग, पारधलिंग, बालुलिंग, स्वर्णलिंग, ताम्रलिंग, दीप तथा ज्योतिर्लंिग, चिलतशिविलंग,
गुरुलिंग, पार्थेश्वर महालिंग अश्या विविध स्वरूपामध्ये विराजमान आहे. विष्णूनी आपली पत्नी लक्ष्मी यांना स्पिटकलिंग भेट दिली. लक्ष्मीने महादेवाचे अखंड पूजन केल्याने स्वत महादेवानी विष्णुपती महालक्ष्मी हे नामकरण केले.
अश्या विविध स्वरु पात विराजमान देवादीदेव महादेवाची आराधना संपूर्ण ब्रम्हांडात केली जात असून त्याच्या विविध रंगाची छटा श्री गिरीबापू यांनी भिक्तमय वातावरणात प्रकट करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.