आधी प्रबोधन, नंतर दंडुक्याचा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:38+5:302021-04-16T04:14:38+5:30
शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसले तर जनता कर्फ्यू सुरू असल्याने ...
शहरात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करीत विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी केल्याने गर्दी कमी झाल्याचे दिसले तर जनता कर्फ्यू सुरू असल्याने तुरळक गर्दी वगळता शांतता दिसून आली. कळवण शहरात सोमवारपासून ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र बुधवारपर्यंत होते.
मात्र राज्यात गेल्या बुधवारपासून संचारबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊन कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण
पोलिसांनी नाकेबंदी करून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करायला सुरुवात केली. पोलीस कारवाईमुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र आज दिसून आले.
फोटो - १५कळवण संचारबंदी
कळवण बसस्थानकाजवळ वाहनांची कसून चौकशी करताना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, वाहतूक पोलीस सचिन राऊत आदी.
===Photopath===
150421\15nsk_58_15042021_13.jpg
===Caption===
फोटो - १५कळवण संचारबंदी कळवण बस स्थानकाजवळ वाहनांची कसून चौकशी करतांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड,वाहतूक पोलीस सचिन राऊत आदी.