ठाणगाव येथे पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:48 PM2020-06-15T12:48:55+5:302020-06-15T12:49:02+5:30

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगाव मध्ये मृगाच्या पहिल्याच पावसात घराची पडझट व घरात पाणी घुसल्याने खत भिंजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

The first rain in Thangaon caused misery to the citizens | ठाणगाव येथे पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना

ठाणगाव येथे पहिल्याच पावसाने नागरिकांची दैना

Next

ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणगाव मध्ये मृगाच्या पहिल्याच पावसात घराची पडझट व घरात पाणी घुसल्याने खत भिंजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून सतत पडणाºया पावसामूळे ठाणगावमधील शेतकरी समाधानी झाला असून गावातील पांडुरंग मुरलीधर काकड यांच्या घरात वाळाचे पाणी घुसल्याने घरातील धान्याची नासाडी झाली आहे.तर किसन सखाराम काकड यांच्या घरातही पाणी घुसल्याने घरातील खत पाण्याखाली गेल्याने तीस ते चाळीस खत गोणी पाण्याखाली गेल्याने काकड यांचे खुप नुकसान झाले आहे.मृगाच्या पहील्याच पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून अनेक घरांचे कौल,पञे यांचेही नुकसान झाले आसून प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी करण्यात येत आहे .

Web Title: The first rain in Thangaon caused misery to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक