पहिल्याच पावसात रस्त्यांची झाली चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:51 PM2019-07-04T23:51:00+5:302019-07-04T23:51:12+5:30
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे.
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार परिसरातून मागणी होऊनदेखील सदरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथून प्रवास करणारे शेतकरी, विद्यार्थी, रहिवासी हैराण झाले आहेत. वारंवार मागणी करूनही रस्त्यांची वेळीच दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्यांचे स्वरूप पाण्याच्या तळ्यांमध्ये झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका वादळी पावसामध्ये रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या दीड ते दोन फुटांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.
सदरच्या रस्त्याने हजारो शेतकरी विंचूर, लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत या मोठ्या बाजारपेठांमध्ये शेतमाल विक्र ीसाठी नेत असतात. रस्त्याची अवस्था पाहिली असता तेथून वाहन न्यावे की नाही, असा प्रश्न चालकांपुढे पडतो. नादुरु स्त रस्त्यांमुळे परिसरामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच होत आहे. या भागातील रस्ते मृत्यूचा सापळा तर होणार नाही नाही ना, असा प्रश्न तेथील रहिवाशी व प्रवाशांना पडत आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी अनेकवेळा लेखी तक्र ारी केल्या आहेत. परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्यांची तात्काळ दुरु स्ती होणे गरजेचे आहे. रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. रोज प्रवास करणारे नोकरदार वर्ग, विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती, रहिवाशी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरु स्तीसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ रस्त्यातील मोठे खड्डे बुजवून परिसरातील नागरिकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे.