देवळालीतून येणार पहिला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:36 AM2019-10-24T01:36:07+5:302019-10-24T01:36:50+5:30

Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील पहिला निकाल देवळाली विधानसभा मतदारसंघातून जाहीर होण्याची शक्यता आहे. देवळाली आणि निफाड या मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांची संख्या कमी असल्याने येथील मतमोजणी अंदाजे तीन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 The first result will come from Deolali | देवळालीतून येणार पहिला निकाल

देवळालीतून येणार पहिला निकाल

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील पहिला निकाल देवळाली विधानसभा मतदारसंघातून जाहीर होण्याची शक्यता आहे. देवळाली आणि निफाड या मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांची संख्या कमी असल्याने येथील मतमोजणी अंदाजे तीन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
देवळालीनंतर निफाड, बागलाण आणि इगतपुरी या मतदारसंघांतील निकाल जाहीर होऊ शकतील. दिंडोरीत सर्वात कमी उमेदवार असले तरी तेथे ३२२ मतदान केंद्रे असल्यामुळे तेथील निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील विविध पंधरा ठिकाणी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर साधारणपणे १४ टेबल लावण्यात येणार आहेत. मात्र दिंडोरी मतदारसंघ यास अपवाद असेल. या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे अवघे पाच उमेदवार असल्यामुळे १२ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. ज्या प्रमाणात मतदान केंद्रे आहेत त्यानुसार मतमोजणीला वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्वात कमी मतदान केंद्र असलेल्या निफाड आणि देवळाली मतदारसंघातील निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांना मतमोजणीसंदर्भात मार्गदर्शनदेखील करण्यात आले. जिल्हाधिकाºयांनीही नांदगाव, निफाड, येवला येथील मतमोजणी केंद्रांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक शाखेकडून सर्व संबंधित कर्मचाºयांना कामकाजाच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या असून, कामकाजाचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. शहरात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली हे चार विधानसभा मतदारसंघ असल्याने येथील मतमोजणी त्या त्या विधानसभा क्षेत्रात होणार आहे. या मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली असून, काही केंद्रांवर डॉग स्कॉडच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे.
सुमारे ६५० कर्मचारी नियुक्त
मतमोजणी करण्यासाठी जवळपास साडेसातशे कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, या कर्मचाºयांचे सकाळी ड्यूटीचे नियोजन करण्यात आले. कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या कर्मचाºयाला पाठविले जाईल याचे नियोजन रॅन्डम पद्धतीने करण्यात आले. एका विधानसभा मतदारसंघासाठी किमान ४५ ते ५० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, वर्ग चार कर्मचाºयांचादेखील यात समावेश आहे.

Web Title:  The first result will come from Deolali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.