पहिल्या फेरीत ८ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या जागा

By admin | Published: July 11, 2017 12:39 AM2017-07-11T00:39:26+5:302017-07-11T00:39:45+5:30

अकरावी प्रवेशप्रक्रिया : २ हजार ४६६ दुसऱ्या, तर १ हजार ४२१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयांत संधी

In the first round, 8 thousand 322 students got first place of choice | पहिल्या फेरीत ८ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या जागा

पहिल्या फेरीत ८ हजार ३२२ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या जागा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीसाठी सोमवारी (दि. १०) रात्री ८.४५ वाजता शहरातील ५७ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसह एसीव्हीसीच्या उपलब्ध जागांसाठी जागावाटपाची यादी जाहीर झाली असून, महानगरपालिका क्षेत्रात एकूण ८ हजार ३२२ विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली आहे.
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी ८ हजार ३२२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या जागा मिळाल्या, तर २ हजार ४६६ विद्यार्थ्यांना दुसऱ्या व १ हजार ४२१ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळाली आहे. पहिल्या क्रमाची पसंती मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा या प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याने त्यांना संधी मिळालेल्या जागेवरच प्रवेश निश्चत करावा लागेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासह दहाव्या स्थानापर्यंतच्या पसंतीक्रमावर संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पहिल्या फेरीनंतर शिल्लक जागांवर त्यांना पसंतीक्रमानुसार संधी मिळेल.बिटकोत विज्ञानसाठी ५०० पैकी ४५४ गुणांक निश्चितबिटको महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी महाविद्यालयात खुल्या प्रवर्गात ५०० पैकी ४५४ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे, तर इतर मागास प्रवर्गाच्या ४२२ गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच बीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी खुल्या प्रवर्गात ४५० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना तर इतर मागास वर्गात ४०७ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी खुल्या गटासाठी ४५६ व ओबीसीसाठी ४३८ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरवायके महाविद्यालाय खुल्या गटातून ४७२ व ओबीसी गटातील ४५८ गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे.

Web Title: In the first round, 8 thousand 322 students got first place of choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.