शासनाला सौरऊर्जा देणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा
By Admin | Published: January 17, 2017 12:23 AM2017-01-17T00:23:10+5:302017-01-17T00:23:27+5:30
विजेची बचत : सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मिती
नाशिक : मानवधन संस्थेच्या धनलक्ष्मीशाळेने सोलर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करून शासनाला वीज देणारी राज्यातील पहिली शाळा बनण्याचा मान मिळवला आहे. संस्थेने आतापर्यंत शाळेत विविध उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणात विजेची बचत करतानाच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांनाही वीज बचतीचे महत्त्व पटवून दिल्याची माहिती संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांनी दिली आहे. भारनियमनाच्या काळात नैसर्गिक स्त्रोतापासून विजेची निर्मिती व बचत करण्याच्या उद्देशाने मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेने २०१९ पासून वीज बचतीचा उपक्र म सुरू केला आहे. गेल्या सात वर्षांत संस्थेने मोठ्या प्रमाणात विजेची बचत केली आहे. संस्थेच्या या उपक्र माद्वारे केवळ विजेची बचतच न होता मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतही झाली आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये वीज बचतीचा उपक्र म नियमित सुरू आहे. छापील माहिती पुस्तक, सर्वेक्षण याद्वारे तसेच परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘झिरो बजेट सेव्ह इलेक्ट्रिसिटी’ या उपक्र मात सहभागी करून घेण्यात आले. संस्थेच्या सुमारे २२००विद्यार्थी व पालकांनी या उपक्र मात सहभागी होऊन प्रत्यक्षात विजेची बचत केल्याचा दावा संस्थेने केला आहे.