भजन स्पर्धेत एकलहरे महिला संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:49 PM2019-11-20T23:49:15+5:302019-11-20T23:49:39+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले.
सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित गटस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात एकलहरे कामगार कल्याण केंद्राच्या संघाने, तर पुरु ष गटात नेहरूनगरच्या संघाने प्रथम क्र मांकाचे पारितोषिक पटकावले.
महिला गटाच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देवळाली कामगार कल्याण केंद्र तर तृतीय क्र मांक ललित कला भवन सिडको केंद्राच्या संघाने पटकावला. तर उत्कृष्ट गायक प्रथम स्मिता जोशी, द्वितीय भावना शिरोडे, तृतीय क्र मांक मनीषा जोशी यांनी मिळविला. उत्कृष्ट पखवाज व तबला वादक म्हणून प्रथम वैभव काळे, द्वितीय हर्षल खैरनार, तृतीय क्र मांक नीलेश तेलोरे यांनी पटकावला. उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथम गायत्री मांडे, द्वितीय उद्धव जोशी, तृतीय क्र मांक साहेबराव गोसावी यांनी तर उत्कृष्ट तालसंघ प्रथम कामगार कल्याण केंद्र ओझर, द्वितीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र गांधीनगर, तृतीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सिडको यांनी यांनी पटकावला.
पुरुष गटाच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक देवळाली कामगार कल्याण केंद्राने पटकावला. तर उत्कृष्ट गायक प्रथम संदीप वारुंगसे, द्वितीय बाबूलाल पवार, तृतीय क्र मांक भारत मांडे यांनी मिळविला. उत्कृष्ट पखवाज व तबलावादक म्हणून प्रथम रघुनाथ रोटे, द्वितीय अक्षय क्षीरस्कर, तृतीय क्र मांक लक्ष्मण दिवटे यांनी पटकावला. उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथम संजय वाजे, द्वितीय भगवान लांबे, तृतीय क्र मांक अर्जुन घोटेकर यांनी तर उत्कृष्ट तालसंघ प्रथम कामगार कल्याण केंद्र देवळाली गाव, द्वितीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सिडको, तृतीय क्र मांक कामगार कल्याण केंद्र सातपूर यांनी पटकावला. पारितोषिक वितरण समारंभास प्रा. अविराज तायडे, जगदीश गोडसे, राहुल पगार, अखिल अण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर उपस्थित होते.